WhatsApp communities feature : कोरोनामुळे सध्या जगभरात सर्वजन घरून काम करत (Work From Home) आहेत, दरम्यान WhatsApp घरातून काम करणाऱ्यांसाठी लवकरच आणखी एक खास फीचर (New WhatsApp Feature) घेऊन येत आहे. या फीचरमुळे लोकांना एकमेकांशी समन्वय साधणे सोपे होणार आहे. WhatsAppचे हे नवे फीचर 'कम्युनिटीज' (Communities) या नावाने ओळखले जाणार असून, यामध्ये Group Admin ला एकाधिक व्हॉट्सॲप ग्रुप्सना एकमेकांशी लिंक करत एक मोठी कम्युनिटी तयार करता येणार आहे. (WhatsApp upcoming communities feature)
हे फीचर एकापेक्षा जास्त ग्रुपचा Admin असलेल्या वापरकर्त्याचे काम सोपे करेल. त्याला सर्व ग्रुपमध्ये एकाच वेळी मेसेज ब्रॉडकास्ट करता येणार आहे. या सर्व ग्रुप्सवर कम्युनिटी अॅडमिनचा ग्रुप अॅडमिनपेक्षा जास्त कंट्रोल असेल आणि तो ग्रुपवर कोण मेसेज करू शकतात इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवेल. तसेच, कोणत्याही ग्रुपमधील सदस्याने कम्युनिटी सोडण्याचा निर्णय घेतल्यास, तो लिंक केलेले इतर ग्रुप पाहू शकणार नाही.
WABetaInfo ने आपल्या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप कम्युनिटी फीचर Admin ला कम्युनिटीसाठी त्यांच्या आवडीचे नाव देणे आणि ग्रुप डिस्क्रिप्शन देता येईल. हे वैशिष्ट्य प्लॅटफॉर्ममध्ये एक मोठी कम्युनिटी तयार करून प्लॅटफॉर्ममध्ये ग्रुप्सना अधिक चांगले मॅनेज करण्यास मदत करेल, ज्यात अनेक लहान सब-ग्रुप्स (Sub-Groups) असतील.
उदाहरणार्थ, एखाद्या कार्यालयात वेगळ्या विभागांसाठी स्वतंत्र WhatsApp ग्रुप असतील तर HR प्रमुख किंवा CEO सर्व ग्रुपना एकत्र जोडण्यासाठी एक WhatsApp Community तयार करू शकतात आणि कम्युनिटीमध्ये लिंक केलेल्या ग्रुपमध्ये समन्वय आणि मेसेज पाठणे सोपे जाईल.
व्हॉट्सॲपने 2021 मध्ये वापरकर्त्यांना अनेक फीचर्सचा लॉंच केले आहेत. आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते येत्या 2022 कडे, नवीन वर्षात कंपनीने अनेक फीचर्सची घोषणा केली आहे. अशी चर्चा आहे की कंपनी iOS वापरकर्त्यांसाठी नवीन बीटा अपडेट रोल आउट करण्याच्या तयारीत असून नव्या वर्षात 2.22.1.1 चा व्हर्जन प्लॅटफॉर्मचे फर्स्ट बीटा अपडेट केले जाईल.
10 ग्रुप एकत्र करता येतील
WABetainfo ने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, एका ग्रुप प्रमाणेच कम्युनिटीचे नाव आणि डिस्क्रिप्शन असेल. नाव आणि डिस्क्रिप्शन दिल्यानंतर वापरकर्त्यास नवीन ग्रुप तयार करण्याचा किंवा जास्तीत जास्त 10 ग्रुप एकत्र लिंक करण्याचा पर्याय मिळेल. कम्युनिटीमध्ये एक Announcement ग्रुप देखील देण्यात येत आहे.
Group Admin चे काम होणार सोपे
रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲप अॅडमिनसाठी हा ग्रुप आपोआप तयार करेल. याद्वारे ग्रुप अॅडमिनला लिंक केलेल्या सर्व ग्रुप्सना मेसेज पाठवता येणार आहे. याशिवाय, कम्युनिटीमध्ये सामील झाल्यानंतर, वापरकर्ते त्यामध्ये लिंक नसलेले ग्रुप पाहू शकणार नाहीत. तसेच, कम्युनिटीमधून बाहेर पडल्यानंतर ते त्यात कम्युनिटीमध्ये लिंक केलेले ग्रुप पाहू शकणार नाहीत. व्हॉट्सॲपकडून हे फीचर कधी रिलीज होणार याबाबत सध्या कोणतीही माहिती नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.