इंटरनेट आल्यापासून आपली अनेक कामे सोप्पी झाली आहेत. त्यातही Whatsapp सारखे ऍप आल्यानंतर आपले जगणे सुसह्य झाले आहे. या ऍपद्वारे आपण मेसेज, फोटो, व्हिडिओ, महत्त्वाच्या फाईल्स त्वरित शेअर करू शकतो.
पण या शेअरिंगसाठी इंटरनेट असणे गरजेचे आहे. इंटरनेट कनेक्शनशिवाय काहीच करता येत नाही. पण, आता ही समस्याही लवकरच दूर होणार आहे. Whatsapp वरून आता लवकरच इंटरनेटशिवाय माहिती, फोटो, व्हिडिओ शेअर करता येणार आहेत, यावर अजून व्हॉट्सअपच्या तज्ज्ञांचा रिसर्च सुरू आहे. (WhatsApp)
WABetaInfo ने सांगितले की व्हाट्सऍपची टिम या फीचरवर वेगाने काम करत आहे. जेणेकरून यूजर्स इंटरनेट कनेक्शनशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या फाइल्स शेअर करू शकतील. शेअर केलेल्या फायली देखील एनक्रिप्ट केल्या जातील. जेणेकरून कोणीही त्यांच्याशी छेडछाड करू शकणार नाही.
अँड्रॉइड फोन्ससाठी व्हॉट्सॲप बीटा वरून एक स्क्रीनशॉट लीक झालेला आहे. त्यात हे स्पष्ट दिवस आहे की, तुम्ही ज्या व्यक्तीला फोटो,व्हिडिओ पाठवणार आहात, तो तुमच्या जवळपास असेल तर त्याचे अकाऊंट शोधून इंटरनेट सुविधा बंद करूनही तुम्ही त्याला फोटो पाठवू शकता.
या स्क्रिनशॉटमध्ये हे फिचर ऑन करण्यासाठी कोणत्या परवानग्या आवश्यक आहेत हे दर्शविते. यामध्ये एक महत्त्वाचा पर्याय असा असेल की या ऑफलाइन फाइल-शेअरिंग फीचरला सपोर्ट करणारे फोन शोधावे लागतील. त्यासाठी ब्लूटुथची मदत घेता येईल.
या परवानग्या असूनही इतर उपकरणे कनेक्ट करण्यासाठी पुरेशी जवळ आहेत की नाही हे तपासण्यासाठी ॲपला Location ऑन करण्याची आवश्यकता असेल. WhatsApp वरील फोन नंबर लपवेल आणि सामायिक केलेल्या फायली एन्क्रिप्ट करेल. यामुळे असे शेअरिंग करणे सुरक्षित आहे की नाही हे पाहता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.