iPhone आणि Android वापरणाऱ्यांनो, 2021 पासून या फोन्सवर व्हॉट्सऍप होणार बंद!

whatsapp_
whatsapp_
Updated on

नवी दिल्ली- आयफोन आणि अँड्रॉइड मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. फेसबुक कंपनीच्या मालकीचे व्हॉट्सअॅप आता 2021 पासून काही आयफोन आणि अँड्रॉइड मोबाईल फोनवर चालणार नाही. जे आयफोन आणि मोबाईल जून्या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतात त्यांना यापुढे व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही. जे स्मार्टफोन iOS 9 किंवा Android 4.0.3 ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतात, त्याच्यासाठी यापुढे व्हॉट्यअॅपची सेवा बंद असणार आहे. 

व्हॉट्सअॅपने ग्राहकांना आपली सेवा सुरु ठेवण्यासाठी नव्या व्हर्जनवर अपग्रेड होण्यास सांगितलं आहे. व्हॉट्सअॅप वापरता येण्यासाठी ऑयफोनची iOS 9 किंवा त्यावरील ऑपरेटिंग सिस्टिम असणे आवश्यक आहे. तसेच अँड्रॉइड मोबाईलसाठी Android 4.0.3 किंवा त्यापेक्षा नवीन ऑपरेटिंग सिस्टिम लागणार आहे. अनेकांकडे नव्या ऑपरेटिंग सिस्टिमचे मोबाईल आहेत, अस असले तरी काही ग्राहकांना याचे नुकसान सहन करावे लागू शकते. 

'जगातील 20 टक्के लोकसंख्येला 2022 पर्यंत कोरोना लस मिळण्याची शक्यता कमी...

आयफोनच्या आयफोन 4 पर्यंतच्या सर्व मॉडेलला व्हॉट्सअॅप सपोर्ट करणार नाही, तर iPhone 4S, iPhone 5, iPhone 5S, iPhone 6 आणि iPhone 6S यांना ऑपरेटिंग सिस्टिम iOS 9 पर्यंत अपडेट करावी लागणार आहे. तेव्हाच त्यांना वॉट्सअॅप वापरता येईल. 

जे अँड्रॉईड स्मार्टफोन 4.0.3. व्हर्जन किंवा त्यापेक्षा अधिकच्या व्हर्जनवर काम करतात, त्यावर वॉट्सअॅप चालणार नाही. अनेकजण आता नवीन व्हर्जनचे अँड्रोइड स्मार्टफोन वापरात, पण एचटीसी डिझायर, एलजी ऑप्टीमस बॅल्क, मोटोरोला ड्रॉईड राझर आणि सॅमसंग गॅलेक्सी s2 अजूनही 4.0.3. व्हर्जनवर काम करतात. त्यामुळे 2021 पासून या स्मार्टफोन्सवर व्हॉट्सअॅपसेवा बंद होणार आहे. त्यामुळे अनेकांवर नवीन मोबाईल खरेदी करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()