Whatsapp Translator : व्हॉट्सॲपवर येतोय तुमचा पर्सनल ट्रान्सलेटर! हव्या त्या भाषेत करा मेसेजचे भाषांतर,जाणून घ्या कसं वापराल?

Whatsapp New Update : व्हॉट्सॲप नवीन फीचर घेऊन येत असून त्याद्वारे तुम्ही थेट चॅटमध्येच संदेशांचे भाषांतर करू शकणार आहात.
WhatsApp Developing Real-Time Chat Translation Faeture
WhatsApp Developing Real-Time Chat Translation Faetureesakal
Updated on

Whatsapp Chat Translation : व्हॉट्सॲप नेहमीच आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स आणि सुविधा घेऊन येत असते. त्यामध्ये व्हॉइस नोट स्टेटस फीचर, मेटा ए आय, व्हाट्सअप फेवरेट, टीचर एचडी क्वालिटी इमेज, यांसारखे अनेक फीचर्स कंपनीने आतापर्यंत रोल आउट केले आहेत. आता व्हॉट्सॲप कंपनी वापरकर्त्यांसाठी आणखी एक नवीन धमाकेदार पिक्चर घेऊन येत आहे. वापरकर्त्यांना हव्या त्या भाषेत चॅटिंग करणे सोयीस्कर होणार आहे कारण चॅटमधील संदेशांचे भाषांतर करणे आता शक्य होणार आहे.

व्हॉट्सॲप नवीन फीचर घेऊन येत असून त्याद्वारे तुम्ही थेट चॅटमध्येच संदेशांचे भाषांतर करू शकणार आहात. या फीचरमुळे विविध भाषिक मित्रांशी गप्पा मारताना भाषेची अडचण दूर होणार आहे.

हे फीचर अजून विकासाच्या अवस्थेत असले तरी, व्हॉट्सॲप सतत यावर काम करत आहे. येत्या अपडेटमध्ये वापरकर्त्यांना या फीचरमध्ये चॅटमधील सर्व संदेश स्वयंचलितपणे भाषांतरित करण्याचा पर्याय असू शकतो. विशेष म्हणजे, संदेशांचे भाषांतर तुमच्या फोनवरच केले जाणार असल्याने तुमच्या संदेशांची गोपनीयता आणि सुरक्षा कायम राखली जाणार आहे.त्याला कोणत्याही प्रकारचा धोका नसेल.

WhatsApp Developing Real-Time Chat Translation Faeture
OpenAI Safety Concern : चॅटजीपीटी सुरक्षित नाही! OpenAIच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीवर केला मोठा आरोप

सुरुवातीच्या टप्प्यात मराठीसह काही निवडक भाषांचाच समावेश या नव्या फीचारमद्धे असण्याची शक्यता आहे. इंग्रजी, हिंदी, अरबी, स्पॅनिश, पोर्तुगीज आणि रशियन या भाषांमधील भाषांतराचा पर्याय प्रारंभिक अपडेटमध्ये उपलब्ध होऊ शकतो. भविष्यातील अपडेटमध्ये आणखी भाषांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सॲप स्वतःचे भाषांतर एंजिन (Translation Engine) वापरत असल्याने अॅपमध्ये हे फीचर सहज समाविष्ट केले जाऊ शकते. यामुळे भाषांतरासाठी संदेश बाहेरच्या सर्वरवर पाठवण्याची गरज नाही. त्यामुळे तुमच्या संदेशांची गोपनीयता आणि सुरक्षेच्या चिंता दूर झाल्या आहेत.

WhatsApp Developing Real-Time Chat Translation Faeture
Amazon Prime Free : ॲमेझॉन प्राईमवर पैसे खर्च न करता एंटरटेनमेंट हवंय? फ्रीमध्ये मिळणार सबस्क्रिप्शन, वापरा 'या' स्मार्ट ट्रिक्स

याआधी व्हॉट्सॲपने व्हॉइस नोट ट्रान्सक्रिप्शन फीचरची चाचणी सुरु केली होती. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही व्हॉइस नोट्सचा मजकूर स्वरूपात वाचू शकता. आगामी काळात व्हॉट्सअँप हे फीचर अधिकाधिक वापरकर्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.

व्हॉट्सॲपच्या या नव्या फीचरमुळे वापरकर्त्यांमध्ये नक्कीच उत्सुकता वाढणार आहे आणि ज्या लोकांना अन्य भाषांमध्ये संदेश गुगलवर जाऊन किंवा अन्य ट्रान्सलेटर वापरून शोधावे लागायचे पण हे आता बंद होणार आहे. या नव्या अपडेट नंतर व्हाट्सअप वापरकर्त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रिया जाणून घेणे रंजक असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.