Independence Day Updates : यंदा भारताचा ७८वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग अकराव्या वेळेस लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करणार आहेत. या वर्षीचं भाषण मोदींचं तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतरच पहिलं भाषण असेल.
पंतप्रधान मोदी सकाळी ७:३० वाजता लाल किल्ल्यावर ध्वज फडकवून आपल्या भाषणाची सुरुवात करतील. यावेळी ते देशाच्या प्रगतीसाठी २०४७ पर्यंत विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करण्याच्या संकल्पनेवर विशेष भर देणार आहेत. 'विकसित भारत' हा या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनाचा मुख्य विषय असून, १००व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिशेने देशाच्या प्रगतीचा मार्ग आखला जात आहे.
पंतप्रधान मोदींचं भाषण दूरदर्शन आणि एनडीटीव्हीवर थेट प्रसारित केलं जाणार आहे. याशिवाय, हे भाषण PIB च्या YouTube चॅनेलवर आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्वीटर) वरही थेट पाहू शकता. पंतप्रधान कार्यालयाचं अधिकृत YouTube चॅनेल आणि अन्य सरकारी वेबसाइट्सवरही या भाषणाचं थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल.या प्लॅटफॉर्मवरुन तुम्ही लाल किल्यावरील लाईव्ह भाषण पाहू शकता.
स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यावेळी 'हर घर तिरंगा' अभियानाद्वारे नागरिकांना त्यांच्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.यंदा 'हर घर तिरंगा' अभियानाचे तिसरे पर्व आहे आणि या अभियानाला यंदाच्या वर्षीही मोठ्या उत्साहाने प्रतिसाद मिळत आहे.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती दिलेल्या शूरवीरांना या दिनी खास आदरांजली वाहिली जाते. लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींचं भाषण हे स्वातंत्र्य दिनाचं मुख्य आकर्षण असतं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.