Science behind Fever : ताप वारंवार का येतो, नाही आला तर काय होईल? जाणून घ्या त्यामागचा विज्ञान

तापाला मेडिकल शास्त्रात "पाइरेक्सिया" असे म्हणतात. हे आपल्याला सर्वांना माहीत आहे की ताप हा आपल्या शरीराचा एक प्रतिसाद आहे, जो शरीराच्या इम्यून सिस्टमला सक्रिय करून बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढण्यात मदत करतो. ही प्रक्रिया पूर्णपणे वैज्ञानिक दृष्ट्या होते. चला, तर मग समजून घेऊया तापाचा मागचा विज्ञान आणि ताप वारंवार का येतो किंवा आला नाही तर काय होईल.
Science behind Fever
Science behind Feversakal
Updated on

ताप म्हणजे काय?

आपल्या शरीराचं तापमान बाहेरच्या वातावरणावर आधारित बदलत असले. तरी साधारणपणे शरीराचं तापमान 37°C (98.6°F) असतं. हे तापमान दिवसभरातील क्रियाकलापांच्या आधारावर एक डिग्री कमी जास्त होऊ शकतं, जे सामान्य आहे. पण जेव्हा शरीराचं तापमान 38°C (100.4°F) पेक्षा जास्त होऊन जातं, तेव्हा त्याचा परिणाम कमजोरी, डोळ्यांमध्ये जळजळ आणि कधी कधी उलटीसुद्धा होऊ शकते. यालाच ताप म्हणतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.