ब्राझिलिया, ता.३१ (वृत्तसंस्था) : दुष्प्रचाराच्या मुद्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर आज ब्राझीलमध्ये बंदी घालण्यात आली. येथील सर्वोच्च न्यायालयाने नव्या कायदेशीर प्रतिनिधीच्या नियुक्तीबाबत घालून दिलेली डेडलाईन पाळण्यात अपयश आल्याने हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला. न्या. अलेक्झांडर डी मोराएस यांनी हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जोवर नियम पाळत नाही आणि आम्ही ठरवून दिलेले शुल्क देत नाही तोवर ही बंदी कायम ठेवण्यात यावी असे म्हटले आहे. या मूळ वादाला एप्रिलमध्ये सुरूवात झाली होती.