Washing Machine ला स्वच्छ करणं गरजेचं, या प्रकारे वाशिंग मशिनमधील घाण करा साफ

वॉशिंग मशिनमध्ये दररोज कपडे धुतले Washing Clothes जात असल्याने तिला स्वच्छ करण्याची आवश्यकता नाही असा अनेकांचा समज असतो. मात्र हा समज चुकीचा आहे
Washing machine cleaning Tips
Washing machine cleaning TipsEsakal
Updated on

Washing Machine Cleaning Tips: तंत्रज्ञानामुळे आपली दैनंदिन जीवनातील बरीच कामं सोपी झाली आहेत. यापैकीच एक महत्वाचं काम म्हणजे कपडे धुणं. वाॅशिंग मशिनमुळे आता कपडे धुण्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनत दोन्ही वाचू लागले आहेत. Why Important to Clean your Washing machine and how to do it

बाजारामध्ये वेगवेगळी वॉशिंग मशिन Washing Machine उपलब्ध आहेत. विविध फिचर्स असलेल्या ही मशिन तुमचे कपडे Clothes अगदी स्वच्छ धुवून देतात. यातील अनेक मशिन तर कपडे कोरडेही करतात. त्यामुळे कपडे वाळवणं सोयीचं झालं आहे.

पण तुमचे कपडे दररोज स्वच्छ करून देणाऱ्या हे वॉशिंग मशिन कधी तुम्ही स्वच्छ करता का? वॉशिंग मशिनमध्ये दररोज कपडे धुतले Washing Clothes जात असल्याने तिला स्वच्छ करण्याची आवश्यकता नाही असा अनेकांचा समज असतो. मात्र हा समज चुकीचा आहे.

कपडे स्वच्छ करताना त्यातील घाणीचे Dirt अनेक कण वॉशिंग मशिनमध्ये साचत असतात. कालांतराने ही घाण वाढत जाते. त्यामुळेत वॉशिंग मशिनही वेळोवेळी स्वच्छ करणं गरजेचं आहे. Washing Machine cleaning

वॉशिंग मशिन स्वच्छ न केल्यास काय होतं

दररोजच्या अस्वच्छ कपड्यांमधील घाण वॉशिंग मशिनमध्ये साचते. यामुळे मशिनमध्ये बॅक्टेरिया जमा होण्याची शक्यता वाढते.

शिवाय ही साचलेली घाण वाढत राहिली तर मशिनच्या कार्यावरही त्याचा परिणाम होतो. काही वेळेस मशिनमध्ये बिघाड निर्माण होतो. तर काही वेळेस मशिन लवकर बंद पडण्याची शक्यता वाढते.

अनेकदा अस्वच्छ वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुतल्यानंतर कपड्यांना विचित्र वास येण्याची शक्यता असते. तसचं कपड्यांवर घाणीचे काही तंतू चिटकू लागतात आणि कपडे स्वच्छ धुतले जात नाहीत. यासाठीच वॉशिंग मशिनलाही धुणं म्हणजेच स्वच्छ करणं गरजेचं आहे.

हे देखिल वाचा-

Washing machine cleaning Tips
Technology : कपडे धुण्याचं टेन्शनंच संपलं; बादलीच करणार Washing Machine चं काम

वॉशिंग मशिन कधी आणि कितीवेळा स्वच्छ करावे

आठवड्यातून एकदा तरी वॉशिंग मशिन पाण्याने स्वच्छ करणं गरजेचं आहे. यासाठी वॉशिंग मशिनमध्ये कपडे आणि डिटर्जंट न टाकता केवळ पाणी भरून एक दोन सायकल होवू द्यावे.

महिन्यातून एकदा वॉशिंग मशिन डीप क्लिन करावी.

याशिवाय जर तुम्ही वॉशिंग मशिनमध्ये किचनचे टॉवेल किंवा फरशी पुसायचं कापड धुवत असाल. तर या नंतर प्रत्येक वेळी वॉशिंग मशिन नुसत्या पाण्याने धुवून घ्यावे. त्यानंतर तुमचे कपडे धुण्यास लावावे.

वॉशिंग मशिन स्वच्छ करण्याच्या पद्धती

विनेगर- वॉशिंग मशिन स्वच्छ करण्यासाठी तुम्ही विनेगरचा वापर करू शकता. यामुळे मशिनमध्ये साचलेला साबणाचा चिकटपणा निघून जाण्यास मदत होईल. याशिवाय अस्वच्छ मशिनमुळे येणारी दुर्गंधी दूर होईल.

यासाठी मशिनमध्ये पूर्ण पाणी भरून त्यात अर्धा कप विनेगर टाकावं. त्यानंतर मशिनचे २-३ वॉशिंग सायकल झाल्यानंतर पाणी काढून टाकावं.

तसचं काही वॉशिंग मशिनमध्ये टब क्लिन Tub Clean हा पर्याय पाहायला मिळतो. मात्र हे टब क्लिन करण्याची योग्य पद्धत अनेकांना ठाऊक नसते. How to clean washing machine tub

टब क्लिनचा पर्याय निवडताना अनेकजण ते नुसत्या पाण्याने करतात. तर काहीजण त्यात डिटर्जंट टाकण्याची चुक करतात. टब क्लिन करतानाही Tub cleanचं बटन दाबल्यानंतर मशिनमध्ये पूर्ण पाणी भरेल.

यानंतर त्यात अर्धा कप विनेगर टाकावं. टब क्लिनिंगसाठी वॉशिंग मशिन साधारण दीड ते दोन तास घेते. मात्र महिन्यातून एकदा तरी टब क्लिन करणं गरजेचं आहे.

हे देखिल वाचा-

Washing machine cleaning Tips
Iron Cleaning Tips : कपडे जाळून कळकटलेली इस्त्री कशी करायची साफ?

बेकिंग सोडा- वॉशिंग मशिन स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा हा देखील एक चांगला पर्याय आहे. यामुळे देखील वॉशिंग मशिनमधील घाणीचे कण निघून जाण्यास मदत होईल तसचं मशिनमधील बॅक्टेरीया दूर होतील.

यासाठी वॉशिंग मशिनच्या ड्रममध्ये पाणी भरून २ चमचे बेकिंग पावडर टाकून १० मिनिटं राहू द्या. त्यानंतर यात १ चमचा डिटर्जंट आणि २ चमचे विनेगर टाका आणि वॉश सायकल करा.

क्लिनिंग उत्पादनांचा वापर- बाजारामध्ये अलिकडे वॉशिंग मशिन स्वच्छ करण्यासाठी विविध पावडर किंवा उत्पादन उपलब्ध आहेत. या उत्पादनांच्या मदतीने देखील तुम्ही वॉशिंग मशिन स्वच्छ करू शकता. या उत्पादनांच्या पॅकिंगवर लिहिलेल्या सुचनांप्रमाणे तुम्ही सहज वॉशिंग मशिन क्लिन करू शकता.

या सोबतच वरचेवर वॉशिंग मशिनचा पाईप स्वच्छ करणं. तिच्या झाकणावर साचलेली धूळ पूसणं. तसचं आतील बाजुने टँकच्या वरच्या बाजूला साचलेला डिटर्जंट तसचं घाणं वेळेवेळी स्वच्छ करणं गरजेचं आहे. यामुळे तुमचं वॉशिंग मशिन जास्त काळ टिकण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.