iPhone : आयफोनचे इतके चाहते का आहेत? असं काय आहे जे Android मध्ये नाही; जाणून घ्या सविस्तर

 apple event 2023
apple event 2023
Updated on

स्मार्टफोन वापरकर्ते आयफोन खरेदी करण्यासाठी इतके पैसे मोजायला का तयार होतात, आयफोन (iPhone) मध्ये नेमकं असं काय मिळतं जे अँड्रॉइड फोनमध्ये मिळत नाही? तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल, आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आयफोन हा जगातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन आहे, असे म्हटले तर त्यावर शंका घेण्याची गरज नाही. जगभरात आयफोनचे चाहते पाहयला मिळातात अॅपल (Apple) प्रॉडक्ट्सचा भारतात खूप मोठ्या प्रमाणात वापरकर्ते असले तरी सामान्य ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी कंपनीला अजून बराच पल्ला गाठणे बाकी आहे. आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या Android फोनवरून आयफोन (iPhone) वर स्विच करण्यास भाग पाडू शकतात. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया....

1. अधिक सुरक्षित आणि प्रायव्हेट

अॅपलच्या मते, आयफोन तुमच्या खासगी माहितीचे संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला फेशियल किंवा फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन सारखी फीचर्स असोत किंवा Apps ना तुमची ऑनलाइन एक्टिव्हिटी ट्रॅक करण्यापासून रोखणे असो, Apple अधिक चांगले काम करते. यामध्ये तुम्हची खाजगी माहिती अधिक सुरक्षित ठेवण्याची काळजी घेण्यात येते. यामध्ये iMessages आणि FaceTime व्हिडिओ कॉल देखील एंड-टू-एंड एनक्रिप्टेड आहेत.

 apple event 2023
Maruti घेऊन येतेय पहिली इलेक्ट्रिक कार; किती असेल किंमत? वाचा

2. कॅमेरे जास्त एडव्हांस

जेव्हा कोणी आयफोनचा कॅमेरा उघडतो तेव्हा Apple कंपनीच्या दाव्यानुसार Night Mode, Portrait Mode आणि Cinematic Mode सारखी फीचर्स आपोआप सुरू होतात. यामुळे आयफोनवरील कॅमेरा वापरणे अधिक सोपे आणि मजेदार बनते. तसेच तुम्हाला फोटो क्वालिटी देखील अप्रतिम मिळते.

3. नियमित OS अपडेट्स

अँड्रॉइड स्मार्टफोन्स साधारणपणे लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेट्स देण्यासाठी खूप वेळ लावतात . दुसरीकडे, आयफोनमध्ये अशी कोणतीही समस्या नाही. iOS अपडेट नियमितपणे मिळतात आमि त्यासोबत तुम्हाला नवीन फीचर्स आणि सुरक्षा बेनिफिट्स मिळतात. ज्यामुळे वापरकर्त्यांचे iPhone कायम अपडेटेड राहातात. सॉफ्टवेअर अपडेट्सद्वारे आयफोनमध्ये अनेक नवीन फीचर्स तुम्हाला वापरता येतात, ज्यामुळे तुमचा आयफोन अधिक अपडेटेड ठरतो.

 apple event 2023
Infinix Zero 5G फोन भारतात लॉंच; तुमच्या बजेटमध्ये बसेल किंमत

4. Move to iOS App

या एका अॅपद्वारे तुम्ही सर्व काही करू शकता. तुम्हाला तुमच्या Android स्मार्टफोनवर Move to iOS अॅप डाउनलोड करावे लागेल. तुम्ही तुमचे कॉन्टॅक्ट्स, मेसेज, फोटो, व्हिडिओ, ईमेल खाती आणि कॅलेंडर अगदी सुरक्षितपणे आयफोनवर ट्रांसफर करू शकता.

5. आयफोनवर स्विच करणे आहे सोपे

जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोनवरून आयफोनवर स्विच करण्याचा विचार करत असाल तर, Apple चा दावा आहे की ही प्रक्रिया खूप सोपी आहे. फोटो, डेटा, कॉन्टॅक्ट्स ट्रान्सफर करणे खूप सोपे आहे.

 apple event 2023
फ्लिपकार्टचा Sell Back प्रोग्राम; जुना स्मार्टफोन विका बेस्ट किंमतीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.