Electric Shock : करंट लगा! अचानक एखाद्या व्यक्तीला स्पर्श केल्यास शॉक का लागतो? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

अचानक एखाद्याला स्पर्श केल्यावर तुम्हालाही शॉक लागतो का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण
Electric Shock
Electric Shocksakal
Updated on

कदाचित तुमच्यासोबतही असे घडले असेल की जेव्हा तुम्ही एखाद्याला स्पर्श केला असेल किंवा कोणीतरी तुम्हाला स्पर्श केला असेल तेव्हा तुम्हाला शॉक लागला असेल. पण असे का होते याचा विचार तुम्ही केला आहे का? यामागे एक वैज्ञानिक कारण लपलेलं आहे. असं का होतं हे जाणून घ्या. 

मज्जातंतूशी संबंधित आहे याचं कारण

या प्रकारचा विजेचा धक्का थेट आपल्या शरीराच्या नसांशी संबंधित आहे. काही लोक या विजेच्या झटक्यांना खूप घाबरतात. यामागचे कारण बी12, बी6 आणि बी1 या जीवनसत्त्वांची कमतरता असल्याचं डॉक्टर आणि तज्ज्ञांचं मत आहे. जर तुम्हाला असा करंट सतत बसत असेल तर तुम्ही डॉक्टरांना कळवावे.

अचानक विजेचा धक्का का बसतो?

न्यूरोलॉजिस्ट म्हणतात की, आपल्या शरीरात विद्युत क्रिया म्हणजेच इलेक्ट्रिकल अॅक्टिव्हिटी (Electrical Activity) सतत सुरु असते. ज्याप्रमाणे घराला वीजपुरवठा करण्यासाठी वायरचा वापर केला जातो, त्याचप्रमाणे तांब्याच्या तारेवर प्लास्टिकचं कोटिंग म्हणजे आवरण असतं. तशाच प्रकारे आपल्या शरीराच्या नसांवरही कोटिंग असतं. वैद्यकीय भाषेत याला मायलिन शीथ म्हणतात. मायलिन शीथ कधीकधी असंतुलित होते आणि जेव्हा तुम्ही दीर्घकाळ त्याच स्थितीत राहता तेव्हा असे होते. त्यामुळे शरीरातील इलेक्ट्रॉन्सचा त्रास होतो. यावेळी, या काळात अचानक एखाद्याला स्पर्श करताच मज्जातंतूंमधील मायलिन आवरण सक्रिय होतात. त्यामुळे स्पार्क होऊन विजेचा धक्का जाणवतो. 

काही लोकांना करंट लागत नाही?

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, करंट लागणं हे प्रत्येक व्यक्तीच्या संवेदनशीलतेवर अवलंबून असतं. त्यामुळे काही लोकांना जास्त काही लोकांना कमी प्रमाणात करंट जाणवतो. तुम्हाला असा करंट सतत बसत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

प्लास्टिकच्या खुर्चीचाही शॉक बसतो..

तुमच्यासोबत असे अनेकदा घडले असेल, तुम्ही प्लास्टिकच्या खुर्चीवर बसला आहात आणि तुम्हाला शॉक लागला आहे. असे घडते कारण जेव्हा आपण प्लास्टिकच्या खुर्चीवर बसतो आणि आपले पाय जमिनीला स्पर्श करत नाहीत, त्या वेळी प्लास्टिकची खुर्ची आपल्या कपड्यांमधून इलेक्ट्रॉन गोळा करते आणि त्यात सकारात्मक चार्ज जमा होतो. खुर्चीवर बसलेली व्यक्ती उठताच हा चार्ज खुर्चीच्या दिशेने जातो आणि खुर्चीला स्पर्श केल्यावर करंट जाणवतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()