Wi-Fi Cyber Security : रेल्वे स्थानकांवर झाला मोठा सायबर हल्ला, Wi-Fi नेटवर्कला केलं टार्गेट, तुम्ही करू नका या चूका, महागात पडेल

Wi-Fi Cyber Security : नुकताच ब्रिटनमध्ये मोठा सायबर हल्ला झाला आहे. येथील 19 रेल्वे स्थानकांवर सार्वजनिक Wi-Fi नेटवर्क हॅक करण्यात आले होते.
Wi-Fi Cyber Security
Wi-Fi Cyber Security esakal
Updated on

Wi-Fi Cyber Security:

जगभरात दररोज अनेक हल्ले घडत असतात. त्यापैकी एक हल्ला असा असतो जो घडून जातो अन् आपल्याला उशीरा समजतो. कारण, हा असतो सायबर हल्ला. टेक्नॉलॉजीचा वापर जितक्या वेगाने वाढत आहे तितक्याच वेगाने त्याचे बरे वाईट परिणामही आपल्याला भोगावे लागत आहेत.

नुकताच ब्रिटनमध्ये मोठा सायबर हल्ला झाला आहे. येथील 19 रेल्वे स्थानकांवर सार्वजनिक Wi-Fi नेटवर्क हॅक करण्यात आले होते. बुधवारी हे नेटवर्क हॅक करण्यात आले होते. त्याचा प्रभाव आजही कायम राहिला. आतापर्यंत हा सायबर हल्ला थांबवण्यात यश आलेलं नाही.

Wi-Fi Cyber Security
Nashik Cyber Fraud : बनावट पोर्टलवरून आयपीओ खरेदीतून लाखोंचा गंडा; सायबर भामट्यांनी केली 94 लाखांची फसवणूक

ब्रिटीश ट्रान्सपोर्ट पोलिस (BTP) या सायबर हल्ल्याची चौकशी करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लंडन, मँचेस्टर, बर्मिंगहॅमसह 19 यूके रेल्वे स्टेशनचे सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क हॅक करण्यात आले होते.

प्रवाशांनी सार्वजनिक वाय-फाय वापरण्यासाठी पासवर्ड लॉग इन केले. यानंतर लगेचच त्यांना दहशतवादी हल्ल्यांबाबत काही मेसेज मिळाले.

या मेसेजमध्ये काही सिक्युरिटी वॉर्निंग अलर्ट आणि संदिग्ध पॉप-अप दिसू लागले. यामुळे रेल्वे प्रवासी घाबरले होते. याबाबत रेल्वे प्रशासनाला माहिती देण्यात आली. ती माहिती मिळताच वाय-फाय नेटवर्क बंद करून प्रकरणाचा तपास सुरू केला गेला.

Wi-Fi Cyber Security
Bluesnarfing Cyber Fraud Alert : नेटकऱ्यांनो, ‘ब्लुस्नार्फिंग’पासून सावधान! नाशिक शहर सायबर पोलिसांचा इशारा

मोठी माहिती हाताला लागली

Wi-Fi नेटवर्क कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. कंपनीने सांगितले की, काल सांयकाळी ग्लोबल रीच एडमिनिस्ट्रेटर अकाउंटचा वापर करून नेटवर्क रेल लैंडिंग पेजवर अनेक बदल करण्यात आले. याने या सायबर हल्ल्याची सुरूवात झाली. या घटनेचा पुढीली तपास BTP द्वारे केला जात आहे.

त्यात म्हटले आहे, आम्हाला काल (बुधवार) संध्याकाळी 5:03 वाजता नेटवर्क रेल वाय-फाय सेवांवर इस्लामोफोबिक संदेश पाठवल्याच्या बातम्या मिळाल्या. आम्ही या घटनेचा वेगाने तपास करण्यासाठी नेटवर्क रेलसोबत काम करत आहोत.

Wi-Fi Cyber Security
Cyber Fraud Alert : ऑनलाइन फोटो पोस्ट करताय? सावध व्हा! तुमचे फिंगरप्रिंट्स चोरी होऊ शकतात; काय आहे नवा फ्रॉड? सुरक्षेचा उपाय पाहा

Wi-Fi कसा ठेवाल सुरक्षित

  • सायबर तज्ञांच्या मते, पब्लिक Wi-Fi सुरक्षित नाही कारण तिथे कोणीही सहजपणे नेटवर्क ऍक्सेस करू शकतो, त्यामुळे जर तुम्ही सार्वजनिक Wi-Fi वापरत असाल तर अशी कोणतीही वेबसाइट उघडू नका जिथून तुमची वैयक्तिक माहिती लीक होऊ शकते.

  • तुमच्या स्मार्टफोनमध्ये ऑटोमॅटिक वायफाय नेटवर्कचा ऑप्शन बंद ठेवा.

  • Public Wi-Fi वायफाय वापरत असताना नेहमी विश्वसनीय नेटवर्क वापरा.

  • फ्रि Public Wi-Fi वापरत असताना तुमची बँकिंग साइत तदग८हट कधीही उघडू नका. तसेच, वाय-फाय वापरत असताना कधीही ऑनलाइन पेमेंट करू नका.

  • पब्लिक वाय-फाय वापरत असताना, सर्वप्रथम तुम्ही सर्व प्रकारचे शेअरिंग थांबवावे. जर तुम्ही सार्वजनिक वाय-फाय वापरण्यासाठी ईमेल आयडी दिला असेल, तर फक्त खास युनिक कोड वापरा. सार्वजनिक वाय-फायवर कधीही ऑफिस किंवा वैयक्तिक काम करू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.