Windows लवकरच लाँच करणार 'Next Generation'; लोगोही बदलणार?

Microsof
Microsof
Updated on

नागपूर : आजच्या युगात संगणकाशिवाय कुठल्याच कंपनीत काम चालत नाही. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकजण संगणकावर (Computer) काम करतो. मात्र याच संगणकाचा आत्मा म्हणजे मायक्रोसॉफ्ट विंडोज. Microsoft Windows मुळे संपूर्ण जगाला कठीण वाटणारं संगणक अगदी काही मिनिटांमध्ये समजण्यास मदत झाली. अगदी windows XP पासून तर आता सध्या असलेल्या Windows 10 पर्यंत windows च्या प्रत्येक जनरेशनमध्ये बदल तर होतेच मात्र यूजर्सना लगेच समजेल असा यूजर इंटरफेस आहे. आता Microsoft Windows लवकरच 'Next Generation' लाँच करणार आहे. (Windows will launch Next Generation on 24 June)

Microsof
तुमच्या एका क्लिकवर Google कसा शोधतो माहिती? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

येत्या 24 जूनला Microsoft Windows 'Next Generation' लाँच करणार आहे. लॉंचिंग सोहळा ऑनलाइन पद्धतीनं भारतीय वेळेनुसार साडे आठ वाजता घेण्यात येणार आहे. मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला (CEO Satya Nadella) यांनी स्वतः ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. विंडोजचं हे नवीन जनरेशन डेव्हलपर्स आणि क्रिएटर्ससाठी आर्थिक संधी घेऊन येणार आहे. या नवीन जनरेशनला 'प्रोजेक्ट सन व्हॅली' (Project Sun Valley) असं नाव देण्यात आलं आहे. तसंच यात नवीन यूजर इंटरफेससह नवीन विंडोज अप्लिकेशन स्टोरसुद्धा राहणार आहे.

Microsoft
Microsoft

मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या ट्विटर अकाऊंटवरून या संबंधीच्या डिटेल्स देण्यात आल्या आहेत. यात पोस्ट करण्यात आलेल्या एका इमेजनुसार विंडोजच्या लोगोमध्येही लहान बदल करण्यात येणार आहे अशी माहिती मिळतेय.

Microsoft
Microsoft
Microsof
तुमच्या मोबाईलची Voice Quality कमी झालीये का? मग करून बघा हे उपाय

मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला यांच्या म्हणण्यानुसार, येणारं windows चं नवीन जनरेशन ही मागच्या १० वर्षातील सर्वात लक्षणीय विंडोज असणार आहे. तसंच अनेकांसाठी हे नवीन जनरेशन पैसे कमवण्याची संधी घेऊन येणार आहे.

(Windows will launch Next Generation on 24 June)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()