Winter Car Care : चुकूनही या गोष्टी कारमध्ये विसरू नका, हिवाळ्यात ठरू शकतात धोकादायक

आपण आपल्या कारमध्ये गरजेच्या बऱ्याच गोष्टी ठेवत असतो. पण हिवाळ्यात जर बऱ्याचवेळ काही गोष्टी कारमध्ये ठेवल्या तर मोठं नुकसान सहन करावं लागेल.
Winter Car Care
Winter Car Careesakal
Updated on

Things Not to Leave in Car in Winter : हिवाळ्यात वातावरणात होत असलेल्या बदलामुळे शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. तशीच काळजी आपल्या कार आणि बाइकची पण घेणे आवश्यक असतं. जर वातावरणानुसार तुम्ही तुमच्या वाहनाची काळजी नाही घेतली तर बरंच नुकसान सहन करावं लागू शकतं.

आपण आपल्या कारमध्ये गरजेच्या बऱ्याच गोष्टी ठेवत असतो. पण हिवाळ्यात जर बऱ्याचवेळ काही गोष्टी कारमध्ये ठेवल्या तर मोठं नुकसान सहन करावं लागेल.

Winter Car Care
Winter Season : थंडीत रहा ऊर्जावान!

ड्रींक्स कॅन

थंडीत पातळ पदार्थ गोठतात आणि जास्त जागा घेतात. जर अशात तुम्ही ड्रींक्स कॅन गाडीत बऱ्याचवेळ ठेवलेल्या असतील तर त्या फुटण्याचा धोका संभावतो.

Winter Car Care
Winter Season : थंडीत तोंडावर पांघरूण घेऊन झोपल्याने हार्टअ‍ॅकचा धोका, वेळीच व्हा सावध

औषधं

बऱ्याचदा औषधं खरेदी करून गाडीतच ठेवतो किंवा विसरून जातो. जर यात इंशुलिन सारखी औषधं असतील तर ते गोठून त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो.

म्युझिकल इंस्ट्रूमेंट

वाद्य थंडीने खराब होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा वस्तू कारमध्ये ठेवणे योग्य नसते.

मोबइल आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस

थंडीचा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसच्या बॅटरीवर वाइट परिणाम होतो. स्मार्टफोन, कंप्युटर आणि टॅबच्या प्रोसेसरचपण नुकसान होऊ शकतं. बहुतेक स्मार्टफोन्समध्ये लिथियम आयर्न बॅटरी असतात, थंडीत त्या संवेदनशील असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.