Geyser Service Tips: हिवाळा सुरू झाला असून अनेक लोक गरम पाण्यासाठी गिझरचा वापर करतात. कारण गिझरमुले कमी वेलेत पाणी लवकर गरम होते. हिवाळ्यात गिझरची वेळेवर सर्व्हिंसिंग करणे गरजेचे आहे. गिझरची पाण्याची टाकी स्वच्छ करणे आणि त्यातील घटकांचे योग्यरित्या काम करत आहे की नाही हे तपासणे गरजेचे असते. सर्व्हिसिंग न केल्यास गिझरची कार्यक्षमता कमी होऊ शकते आणि यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. जर तुमच्या घरात गिझर असेल आणि तुम्ही त्याची सर्व्हिसिंग केली नसेल, तर कोणते नुकसान होऊ शकते आणि ते टाळण्याचे काय करावे हे सोप्या शब्दात समजून घेऊया.