नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळानंतर आता लोकांचे ऑफिस सुरु झाले आहेत आणि लोकं आता वर्क फ्रॉम होमवरुन आता ऑफिसमध्ये जाऊन काम करु लागले आहेत. प्रत्येक ऑफिसमध्ये प्रिंटरची गरज असते. कोणत्याही कार्यालयात प्रिंटरची गरज असतेच. पण तुम्हाला वाटत असेल की प्रिंटर खरेदी करणं खूप खर्चिक असेल पण तसं नाहीये. कारण सध्या बाजारात आपल्याला परवडतील असे प्रिंटर उपलब्ध आहेत.
सध्या बाजारात उपलब्ध असलेले प्रिंटर आपण पाहिले तर आपला विश्वास बसणार नाही कारण आपल्या खिशात बसू शकतील असे प्रिंटर सध्या बाजारात मिळतात. त्याला आपण आपल्या फोनलाही कनेक्ट करु शकतो. हा प्रिंटर आपल्याला घ्यायचा असेल तर आपण Amazon वरुन खरेदी करु शकतो. Paperang कंपनीचा हा प्रिंटर आपण आपल्या फोनला कनेक्ट करुन खिशात घेउन फिरु शकतो. विशेष म्हणजे या प्रिंटर साठी शाईची गरज नाही.
किंमत
PAPERANG P1 कंपनीच्या या प्रिंटरची किंमत सध्या २७९९ रुपये इतकी असून ऑनलाईन पद्धतीने ते आपण खरेदी करु शकता. हे एक थर्मल प्रिंटर असून स्मार्टफोन, कॉम्प्युटर, मॅकबुक यांच्यासोबत वापरु शकतो. त्यामध्ये १०००mAH ची बॅटरीही दिली जाते.
कसा कराल वापर?
हे प्रिंटर वापरण्यासाठी आपल्याला Paperang नावाचं एक अॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. त्या अॅपमध्ये आपल्याला काही डिटेल्स मिळू शकतील. त्यामध्ये फॉन्ट, फिल्टर, थीम, टेम्प्लेट आणि इतर ऑप्शन मिळतात. त्यामध्ये आपल्याला पेपर रोलसहित चार्जिंग केबल पण दिलेली आहे. शाईविना हे प्रिंटर काम करत असल्याने त्यासाठी खर्च खूप कमी लागतो. याला आपण ट्रेन, बस, घर आणि इतर ठिकाणी कुठेही वापरु शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.