Chef Magic : तुम्ही फक्त रेसिपी निवडा, जेवण बनवेल हा 'एआय रोबोट'.. पाहा कसं करतो काम, अन् किती आहे किंमत?

Sanjeev Kapoor : शेफ मॅजिक या रोबोटमध्ये सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर यांच्या तब्बल 200 रेसिपीज लोडेड आहेत. यामध्ये इंडियन, व्हीगन, जैन, कॉन्टिनेंटल, थाई, चायनीज, इटालियन, मेक्सिकन आणि वेदिक रेसिपी देखील आहेत.
Chef Magic Kitchen Robot
Chef Magic Kitchen RoboteSakal
Updated on

Wonderchef Chef Magic Robot : आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे आपल्या आयुष्यावर मोठा प्रभाव पडला आहे. आजकाल सर्वच कंपन्या एआयच्या मदतीने आपले प्रॉडक्ट्स अधिकाधिक सक्षम बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. यामुळे आपलं दैनंदिन जीवन अधिक सोपं होत आहे. यातच आता प्रीमियम किचन प्रॉडक्ट्स बनवणारी कंपनी वंडरशेफने चक्क स्वयंपाक करणारा रोबोट सादर केला आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा एक किचन रोबोट आहे. 'शेफ मॅजिक' (Chef Magic) असं नाव असणारा हा रोबोट घरी जेवण बनवण्याचा अनुभव पूर्णपणे बदलून टाकेल असं कंपनीने म्हटलं आहे. वंडरशेफचे संस्थापक आणि सीईओ रवी सक्सेना यांनी याबाबत माहिती दिली. जून महिन्यापासून हा रोबोट भारतात आणि इतर देशांमध्ये उपलब्ध होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

200+ रेसिपी करतो तयार

शेफ मॅजिक या रोबोटमध्ये सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर (Sanjeev Kapoor) यांच्या तब्बल 200 रेसिपीज लोडेड आहेत. यामध्ये इंडियन, व्हीगन, जैन, कॉन्टिनेंटल, थाई, चायनीज, इटालियन, मेक्सिकन आणि वेदिक रेसिपी देखील आहेत. शाकाराही, आयुर्वेदिक तसंच मधुमेह आणि हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी खास रेसिपी यामध्ये लोडेड आहेत. (Chef Magic Recipes)

या रोबोटवर असणाऱ्या टच-स्क्रीनच्या माध्यमातून तुम्ही यातील हवी ती रेसिपी निवडू शकता. हा रोबोट एक कनेक्टेड डिव्हाईस असून, भविष्यात यामध्ये दर आठवड्याला नवीन रेसिपी अपलोड करण्यात येईल, असं रवी यांनी सांगितलं. यूजर्स आपल्या रोबोटला वायफायने कनेक्ट करुन या रेसिपी डाऊनलोड करू शकतील.

Chef Magic Kitchen Robot
Robot Dog Kanpur : 'रोबोट डॉग'ला पाहून खऱ्या कुत्र्यांची मजेशीर प्रतिक्रिया; कानपूरमधील व्हिडिओ होतोय व्हायरल

कसा करतो काम?

  • तुम्हाला केवळ टच स्क्रीनच्या मदतीने हवी ती रेसिपी सिलेक्ट करायची आहे.

  • यानंतर स्क्रीनवर दिसणारं साहित्य या मशीनमध्ये टाकायचं आहे.

  • यानंतर त्या साहित्याचं वजन करणे, भाज्या चिरणे, साहित्य मिक्स करणे, उकळणे, ब्लेंड करणे किंवा भाजणे अशा सर्व प्रक्रिया ही मशीन स्वतःच करेल.

  • मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही ही मशीन दुरून देखील कंट्रोल करू शकता.

  • तुम्ही यामध्ये स्वतःच्या रेसिपी सेव्ह देखील करू शकता.

बॅचलर्सना होईल मोठा फायदा

शेफ संजीव कपूर हे यावेळी म्हणाले, की आजकालची तरुण पिढी बाहेरचं खाण्याला जास्त प्राधान्य देत आहे. बऱ्याच वेळा बॅचलर तरुण-तरुणींना बाहेरचं खायचं नसतं, मात्र जेवण बनवता येत नसल्यामुळे त्यांच्याकडे बाहेरचं खाण्याशिवाय पर्याय नसतो. शिवाय विदेशात राहत असणाऱ्या भारतीयांना इंडियन डिशेस मिळणं अवघड असतं. या सर्वांसाठी शेफ मॅजिक हा एक उत्तम पर्याय ठरू शकेल. (Wonderchef Chef Magic)

Chef Magic Kitchen Robot
Apollo Humanoid Robot : आता ह्युमॅनॉईड रोबोट बनवणार मर्सिडीजच्या गाड्या; कसा करतो काम? पाहा व्हिडिओ..

किती आहे किंमत?

या रोबोटची किंमत (Chef Magic Price) 59,999 रुपये एवढी आहे. मात्र, प्री-बुक केल्यास यावर 10,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. 5,000 रुपये भरुन प्री-बुक केल्यास तुम्हाला हा रोबोट 49,999 रुपयांना मिळेल. वंडरशेफच्या अधिकृत वेबसाईटवरुन तुम्ही हा रोबोट प्री-बुक करू शकता. यासाठी एस्टिमेटेड डिलिव्हरी टाईम 45 दिवसांचा असल्याचं कंपनीने वेबसाईटवर म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()