World Animation Day 2022 : आजच्या काळात तंत्रज्ञान कितीही विकसित झालेलं असलं तरी भारतीयांनी संस्कृतीची, पुराणांची कास सोडलेली नाही याचं हे सुखद उदाहरण म्हटलं तरी हरकत नाही. घरोघरी बघितलं तर लहान मुलं दिवस-रात्र कार्टून चॅनल बघत असताना दिसतात.
मुलांच्या कोणत्याही कार्टूनचं निरीक्षण केलं तर एक सुपर हिरोप्रमाणे ते मुख्य कॅरेक्टर मुलांसमोर काहीतरी आदर्श ठेवण्याचा प्रयत्न करताना दाखवतात. टी. व्ही.च्या कार्टून्समध्ये बहुतांश भारताबाहेरचे शोज असतात. पण ॲनिमेटेड मूव्हीजमध्ये भारतीय सिनेमांनाही चांगली पसंती मिळत असताना दिसत आहे.
भारतीय ॲनिमेटेड मूव्हीजमध्ये बहुतांश पसंती ही कृष्ण, हनुमान, रामायण, महाभारत, विष्णू अवतार यांना मिळत असल्याचं दिसून आलं आहे. तर आता आपण टॉप १० भारतीय ॲनिमेटेड मूव्हीज कोणत्या बघूया.
1. रामायण
हा ॲनिमेटेड मूव्ही १९९२ मध्ये बनवण्यात आला होता. हा सिनेमा बॉलिवूडची निर्मिती नाही. ज्यावेळी भारत आणि जपान आपला ७० वा वर्धापनदिन साजरा करत होते त्यावेळी बनवण्यात आला होता.
2. हनुमान
हा सिनेमा २००५ मध्ये सहारा इंडिया परिवाराने काढला होता. हा सिनेमा फारच थोड्यावेळात फारच प्रसिध्द झाला होता.
3. द रिटर्न ऑफ हनुमान
हनुमान सिनेमाच्या यशानंतर दोन वर्षांनी द रिटर्न ऑफ हनुमान काढण्यात आला. हा पहिल्या हनुमान मुव्हीचा सिक्वल नव्हता. हनुमान हे कॅरेक्टर समान ठेऊन वेगळी कथा गुंफण्यात आली होती.
4. बाल गणेश
बाल गणेश हा २००७ मध्ये आलेला सिनेमा मुलांच्या आवडत्या सिनेमांपैकी एक आहे. यात गणेशाला बाल रुपात, खड्याळ, खोडकर दाखवल्यानं मुलांचा विशेष लाडका झाला आहे.
5. रोड साइड रोमिओ
रोड साइड रोमिओ ही हिंदी अमेरिकन फिल्म आहे. ही एक म्युझिकल कॉमेडी आहे. ही फिल्म तुम्ही जगभर कुठेही बघू शकतात कारण याचं डिस्ट्रीब्युशन डिझनी स्टूडिओने केलं आहे.
6. जंबो
जंबो द एलिफंट हे नाव तुम्ही ऐकलं असेलच. पण जंबो ही फिल्म या अमेरिकन जंबो द एलिफंट चा रिमेक नाही. तर थाय मूव्ही खान क्लूये चा रिमेक आहे. हा जंबो आपल्या वडिलांच्या शोधात असतो.
7. दशावतार
इतर फिल्मप्रमाणे ही फिल्मपण हिंदू मायथोलॉजीवर आधारीत आहे. या फिल्मला फक्त मुलांकडूनच नाही तर पालकांकडूनही बरीच पसंती मिळाली होती.
8.घटोत्कच
ही फिल्म २००८ मध्ये आली. भीम आणि हिडींबाचा मुलगा घटोत्कच याच्या जीवनावर ही गोष्ट साकारण्यात आली आहे. याची कथा सिंगीतम श्रीनिवास राव यांनी लिहिली आहे.
9. बाल गणेशा २
ही फिल्म बाल गणेशची सिक्वल होती. यात काही ॲडव्हेंचरस फाईट दाखवण्यात आल्या आहेत.
10. टूनपूर का सुपर हिरो
ही फिल्म भारतातली पहिली लाईव्ह ॲक्शन थ्रीडी ॲनिमेशन कॉम्बिनेशन फिल्म आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.