World Asteroid Day : अंतराळातील रहस्याचा दिवस! जागतिक लघुग्रह दिन साजरा करण्यामागील रहस्य जाणून घ्या

Asteroid Day 2024 : आकाशगंगेत सूर्याच्या सर्व बाजूंनी फिरणाऱ्या खडकाच्या गोल गोळ्यांना लघुग्रह (Asteroid) म्हणतात.जागतिक लघुग्रह दिन दरवर्षी ३० जून रोजी साजरा केला जातो.
World Asteroid Day 2024
World Asteroid Day 2024esakal
Updated on

Science Update : आकाशगंगेत सूर्याच्या सर्व बाजूंनी फिरणाऱ्या खडकाच्या गोल गोळ्यांना लघुग्रह (Asteroid) म्हणतात. अजूनही अंतराळात अनेक लघुग्रह आहेत ज्यांचा पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच जागतिक लघुग्रह दिन (World Asteroid Day) दरवर्षी ३० जून रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे लघुग्रह पृथ्वीला धडकेल तर होणारी आपत्ती आणि त्यापासून बचाव कसा करायचा याबाबत जागरूकता निर्माण करणे.

लघुग्रह पृथ्वीचा मित्र की शत्रू?

सूर्यमालेच्या निर्मितीच्या वेळी निर्माण झालेले हे लघुग्रह अवकाशात विहार करत असतात. एखादा मोठा लघुग्रह पृथ्वीला धडकला तर मोठी आपत्ती ओढवू शकतो. पण हेच लघुग्रह आपल्या सूर्यमालेच्या इतर ग्रह आणि त्यांच्या निर्मितीबद्दल खूप काही माहिती देऊ शकतात.

World Asteroid Day 2024
Sunita Willimas Space : अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्मम्ससमोर आलं आणखी एक मोठं संकट, नासाने अलर्ट केलं नसतं तर...

जागतिक लघुग्रह दिनाचा इतिहास

२०१५ साली '५१ डिग्रीज नॉर्थ' नावाच्या सिनेमात दाखविल्याप्रमाणे एखादा लघुग्रह लंडनवर पडला तर काय होईल यावर आधारित होता. या सिनेमाच्या निर्मात्यांनी ( ज्यात बरेचसे शास्त्रज्ञ होते ) लोकांमध्ये लघुग्रह आणखी अंतराळातील धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी एक संस्था स्थापन केली आणि २०१५ साली जगातील पहिला आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन साजरा केला.पुढे २०१६ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने ३० जून हा दिवस आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर केला.

World Asteroid Day 2024
ISRO Rocket Launch: भारताची अंतराळ क्षेत्रात मोठी झेप! ISRO जुलैमध्ये लाँच करणार सगळ्यात लहान उपग्रह

जागतिक लघुग्रह दिन कसा साजरा कराल?

  • स्वतःला शिक्षित करा - NASA किंवा B612 Foundationच्या वेबसाइटवर जाऊन लघुग्रह, धूमकेतू आणि पृथ्वीच्या जवळ येणाऱ्या खगोलीय वस्तू (NEOs) बद्दल जाणून घ्या.

  • कार्यक्रमात सहभागी व्हा - जगातील अनेक संस्था लघुग्रह दिनाच्या आसपास लघुग्रहशी संबंधित कार्यक्रम आणि उपक्रम ऑनलाइन पद्धतीने देखील आयोजित करतात. या कार्यक्रमांची माहिती Asteroid Dayच्या वेबसाइटवर मिळेल.

  • सोशल मीडियावर शेअर करा - #WorldAsteroidDay हा हॅशटॅग वापरून लघुग्रह आणि पृथ्वीच्या रक्षणाबद्दल माहिती सोशल मीडियावर शेअर करा.

या जागतिक लघुग्रह दिनानिमित्त आपणही पृथ्वीच्या रक्षणाची शपथ घ्या आणि इतरांनाही जागरूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.