World Ozone Day 2023 : ओझोनचा थर अजूनही धोक्यात आहे का? आपण काय घ्यावी खबरदारी?

ओझोन हा वायू सूर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचं रक्षण करतो.
World Ozone Day 2023
World Ozone Day 2023 eSakal
Updated on

आपल्याला माहिती आहे, की पृथ्वीचे वातावरण हे अनेक प्रकारच्या वायूंपासून तयार झालं आहे. वातावरणाच्या अनेक थरांपैकी, एक थर हा ओझोन वायूचा आहे. हा वायू सूर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचं रक्षण करतो. असं हे पृथ्वीचं सुरक्षा कवच आपण करत असलेल्या प्रदूषणामुळे नष्ट होत आहे.

यामुळेच, ओझोनच्या संरक्षण आणि संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून पाळला जातो. ओझोनच्या थराला भगदाड पडलं आहे, आणि तो कमकुवत होत आहे असं आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मात्र, सध्या काय परिस्थिती आहे? जाणून घेऊया.

World Ozone Day 2023
Aditya L1 Selfie : 'आदित्य'ने काढला सेल्फी; पृथ्वी अन् चंद्राचेही काढले फोटो! पाहा व्हिडिओ

संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ओझोनचा थर हा हळू-हळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, हे एका रात्रीत झालेलं नाही. गेल्या 35 वर्षांपासून यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. याचा परिणाम आता दिसून येतो आहे. अजूनही ओझोनचा थर पूर्णपणे रिकव्हर होण्यासाठी 2040 सालापर्यंतचा वेळ लागेल असंही यूएनने म्हटलं आहे.

कशी करता येईल मदत?

ओझोनच्या थराला आणखी नुकसान होऊ नये यासाठी आपण अगदी छोट्या स्तरावर देखील प्रयत्न करू शकतो. प्रदूषण करणाऱ्या वाहनांचा वापर कमी करणे हा यासाठीचा सगळ्यात सोपा उपाय आहे. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका ओझोनच्या थराला बसतो. त्यामुळे, इलेक्ट्रिक वाहने, सायकल किंवा सार्वजनिक वाहने यांचा वापर करून तुम्ही ओझोनला मदत करू शकता.

World Ozone Day 2023
Chandrayaan 1 : पृथ्वीमुळेच चंद्रावर तयार होतंय पाणी; 'चांद्रयान-1'ने दिलेल्या डेटामधून मोठा खुलासा

याव्यतिरिक्त क्लोरोफ्लुरोकार्बन (CFC) गॅसेसचा वापर कमी करणे हादेखील एक पर्याय आहे. खरंतर या गॅसवर बंदी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, तरीही काही कंपन्या याचा वापर करतात.

आपल्या घरातील एसी आणि फ्रीजमध्ये कित्येक वेळा ओझोनला नुकसान पोहोचवणारे (HCFCS) घटक असू शकतात. विशेषतः जुन्या एसी किंवा फ्रीजमध्ये हे घटक आढळून येतात. त्यामुळे खराब झालेला एसी-फ्रीज तातडीने दुरूस्त करून घेणे किंवा बदलून घेणे हेदेखील ओझोनसाठी फायद्याचं ठरू शकतं.

World Ozone Day 2023
Nuclear Winter Theory : न्यूक्लियर विंटर थिअरी म्हणजे काय? जगावर अणुहल्ले झाले तर संपूर्ण पृथ्वी अंधारात बुडून जाईल आणि कडकडीत हिवाळा पडले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.