Social Media Day 2023 : आजपासून 26 वर्षांपूर्वी सुरू झालं होतं पहिलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, जाणून घ्या

जगभरात दरवर्षी ३० जूनला सोशल मीडिया डे साजरा केला जातो.
World Social Media Day 2023
World Social Media Day 2023esakal
Updated on

First Social Media Platform Six Degrees : जगभरात दरवर्षी ३० जूनला सोशल मीडिया डे साजरा केला जातो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत सोशल मीडिया पोहचावा म्हणून वर्ल्ड सोशल मीडिया डेची सुरूवात करण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत गोष्टी फार बदलल्या आहेत. आज भरपूर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत.

पण तुम्हाला माहिती आहे का की, पहिला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणता होता? याशिवाय सोशल मीडियाला घेऊन लोकांमध्ये कसे बदल होत गेले? चला जाणून घेऊया.

World Social Media Day 2023
World Social Media Day 2023esakal

सिक्सडिग्री पहिलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म

  • बहुतांश लोकांना वाटत असेल की, फेसबुक पहिलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. पण असं अजिबात नाहीये. फेसबुक सध्याचा लोकप्रिय सोशल मीडिया आहे. पण पहिला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'सिक्सडिग्री' हा आहे.

  • याची स्थापना एंड्र्यु वेनरिच (Andrew Weinreich) यांनी केली होती.

  • याली १९९७ मध्ये लाँच करण्यात आलं होतं. पण २००१मध्ये ते बंद करण्यात आलं.

  • त्यावेळीही या प्लॅटफॉर्मवर १० लाखाहून अधिक यूझर्स होते.

  • यावरही मित्रपरिवार, कुटुंबाची लोक यांच्याशी जोडत होते.

  • याशिवाय बुलेटिन बोर्ड, शाळेचे एफिलीकेशन आणि प्रोफाइस असे मजेशीर फिचर्सही होते.

World Social Media Day 2023
Social Media : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास कारवाई; गुन्हा दाखल करण्याचा इशारा - चंद्रशेखर यादव
World Social Media Day 2023
World Social Media Day 2023esakal

सोशल मीडियावर सर्वाधिक वेळ कोण घालवत?

  • जर सोशल मीडियावर वेळ घालवण्याविषयी विचार केला तर नायझेरियाचे लोक सर्वाधिक वेळ सोशल मीडियावर घालवतात.

  • ते साधारण ४ तास ७ मिनीटांचा वेळ सोशल मीडियावर घालवतात.

  • या यादीत भारताचा तिसरा क्रमांक आहे.

  • भारतात सरासरी लोक २ तास ३६ मिनीटं सोशल मीडियावर घालवतात.

World Social Media Day 2023
Social Media : सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार - सतीश होडगर

ग्लोबल वेब इंडेक्सनुसार यादी

  • नायझेरिया - ४.०७ तास

  • फिलीपिंस - ४.०६ तास

  • भारत - २.३६ तास.

  • यूएस - २.१४ तास

  • चीन - १.५७ तास

  • यूके - १.४८ तास

  • जर्मनी - १.२९ तास

  • जपान - ००.५१ तास.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.