Realme GT Neo 3 हा स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन ग्लॉस ब्लॅकसह तीन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. ग्राहकांना हा फोन अल्ट्रा स्लिम आणि लाइटवेट डिझाइनमध्ये सादर करण्यात आला असून Realme GT Neo 3 स्मार्टफोनचे वजन 188 ग्रॅम आहे. तर जाडी 8.2 मिमी आहे. इतकेच नाही तर Realme GT Neo 3 स्मार्टफोन हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे, जो 150W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. Realme चा दावा आहे की हा फोन फक्त 5 मिनिटात शून्य ते 50 टक्के चार्ज होईल.
स्पेसिफिकेशन्स
Realme GT Neo 3 स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचा स्क्रीन रिफ्रेश दर 120Hz आहे. हा फोन पंच-होल कटआउट आणि 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सह सादर करण्यात आला आहे.
या स्मार्टफोनला मागील बाजूस ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा 50 मेगापिक्सेल सोनी IMX766 सेन्सर सपोर्टसह येतो. फोनचा मुख्य कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सपोर्टसह येतो. याशिवाय 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे.
Realme GT Neo 3 - बॅटरी आणि प्रोसेसर
Realme GT Neo 3 स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 8100 SoC चिपसेट सपोर्टसह दिला जाईल. फोनला ड्युअल स्पीकरसह डॉल्बी अॅटमॉस सपोर्ट दिला जाईल.हा फोन Android 12-आधारित Realme UI 3.0 आउट-ऑफ-द-बॉक्स वर काम करेल. तसेच फोन 12 GB रॅम आणि 128 GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. Realme GT Neo 3 स्मार्टफोनचे 4500mAh बॅटरी मॉडेल 150W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. तर 5000mAh मॉडेल 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह दिले जाईल.
किंमत किती असेल?
6GB + 128GB - CNY 1999 (अंदाजे रु. 24,000)
8GB + 128GB - CNY 2299 (अंदाजे रु. 27,600)
8GB + 256GB - CNY 2599 (अंदाजे रु 31,200)
Realme कडून फोन 150W फास्ट चार्जिंगसह दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. ज्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे-
8GB + 256GB - CNY 2699 (अंदाजे रु. 32,400)
12GB + 256GB - CNY 2899 (अंदाजे रु 34,800)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.