Edible Battery : जगातली पहिली अशी बॅटरी, आधी वापरा अन् मग खाऊन टाका, खासियत वाचून हैराण व्हाल

जीवंत प्राण्यांच्या शरीराच्या आत होणाऱ्या रिअॅक्शनची प्रेरणा घेत शास्त्रज्ञांनी जगातली पहिली खाण्यायोग्य रिचार्जेबल बॅटरी बनवली आहे
Edible Battery
Edible Batteryesakal
Updated on

World's First Edible Battery : चार्ज करणारी बॅटरी जवळपास तुम्हाला सगळ्यांच्याच घरी दिसून येईल. मात्र ही बॅटरी खाताही येऊ शकेल असा विचार तुम्ही कधी स्वप्नातही केला असेल. होय जीवंत प्राण्यांच्या शरीराच्या आत होणाऱ्या रिअॅक्शनची प्रेरणा घेत शास्त्रज्ञांनी जगातली पहिली खाण्यायोग्य रिचार्जेबल बॅटरी बनवली आहे.

या बॅटरीची खासियत अशी आहे की, ही बॅटरी वापरल्यानंत तुम्ही खाऊ शकता.या बॅटरीला इटलीच्या इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि युनिवर्सिटी ऑफ सेलेंटो(IIT)च्या शास्त्रज्ञांनी विकसित केलंय.

Edible Battery
Edible Battery

काय आहे या बॅटरीची खासियत?

अॅडवांस मटेरियल्स अॅन एडिबल रिचार्जेबल बॅटरी, नावाच्या जर्नलमधे याबाब रिपोर्ट जारी करण्यात आली आहे. ही बॅटरी त्यांनी बायो केमिकल रेडॉक्स रिअॅक्शन्सची प्रेरणा घेत बनवलेली आहे. आयआयटीच्या संशोधकांचे असे म्हणणे आहे की या बॅटरीमधे रायबोफ्लेविन बी-२ आहे. हे व्हिटॅमिन बदाममधे आढळून येते. आणि क्वेरसेटिन ही एक फूड सप्लिमेंट आहे जी केपर्समधे आढळून येते. याशिवाय या बॅटरीमधे दोन इलेक्ट्रोड्स लागलेले आहेत.

Edible Battery
World's first SMS: कोणी पाठवला होता जगातील पहिला SMS? 'या' मेसेजमध्ये नक्की काय होते? पाहा डिटेल्स

ही बॅटरी तुम्ही वारंवार चार्जिंरसाठी वापरू शकता

यूनिव्हर्सिटीने असे म्हटले आहे की, बॅटरीचे ओपन सर्किट आउटपुट 650mVचे आहे आणि ही बॅटरी 12 मिनिटांसाठी 48μA किंवा एक तास अधिक मायक्रोअॅप्स प्रदान करतात. तसेच ही बॅटरी अनेकदा रिचार्ज केली जाऊ शकते.

Edible Battery
World First Mobile Phone : एवढी होती जगातल्या पहिल्या मोबाईल फोनची किंमत

भविष्यात याचा उपयोग कुठे होऊ शकतो?

या संशोधनाचे टीम लीड मारिओ कॅरोनी म्हणाले, "भविष्यात या बॅटरीचा उपयोग खाद्य सर्किट आणि सेंसर ते फूड स्टोरेज चेक करण्यासाठी सेंसर पॉवरवर लक्ष ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. याशिवाय लहान मुलांच्या खेळण्यांमधे याचा उपयोग सेफ्टीसाठी केला जाऊ शकतो. तसेच भविष्यात या बॅटरीचा उपयोग खाद्य सॉफ्ट रोबोटला पॉवर प्रदान करण्यासाठीही केला जाऊ शकतो. (Technology)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.