WormGPT : तुम्हाला चॅटजीपीटी माहितीच असेल, पण तुम्हाला वर्मजीपीटी माहीत आहे का? आता हा नवा चॅटबॉट जगभर वेगाने लोकप्रिय होतोय. याच्या लोकप्रियतेच कारण म्हणजे लोकांना मदत न करता त्यांच्यासाठी धोके वाढवणं. म्हणजे काय? तर हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सुसज्ज चॅटबॉट आहे. सायबर सिक्युरिटी फर्म स्लॅशनेक्स्टच्या म्हणण्यानुसार, सायबर क्राइम सारखे गुन्हे करण्यात हे चॅटबॉट आघाडीवर आहे.
वर्मजीपीटी म्हणजे काय आणि तो किती धोकादायक आहे?
स्लॅशनेक्स्टने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की हे टूल ChatGPT मॉडेलप्रमाणे काम करतं. त्याची रचना सायबर क्राईम सारख्या कारवायांसाठी करण्यात आली आहे. वर्मजीपीटी जीपीटी हे भाषेच्या मॉडेलवर काम करतं. 2021 मध्ये हे मॉडेल तयार करण्यात आलं होतं.
आता यामुळे सायबर गुन्हे कसे घडतात ते समजून घेऊ. वर्मजीपीटी अनलिमिटेड कॅरेक्टरला सपोर्ट करतं. चॅट मेमरी राखून ठेवते आणि कोड लिहिण्याची याची क्षमता खूप जास्त आहे. या कोड्सद्वारे मालवेअर आणि फिशिंग हल्ले केले जाऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सायबर क्राइम सहज राबवता येईल असा कोड याद्वारे तयार केला जातो. मग असा असुरक्षित चॅटबॉट कोणी तयार केला? तर आतापर्यंत त्या व्यक्तीचं किंवा कंपनीचं नाव समोर आलेल नाही.
सायबर गुन्हे कसे करायचे?
द इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, काही युजर्सने वर्मजीपीटीला लोकांना ईमेल पाठवून बनावट बिलांच्या मदतीने पैसे मागण्याचे आदेश दिले. ऑर्डर मिळताच वर्मजीपिटीने एक ईमेल तयार केला आणि अतिशय हुशारीने लिहिला. अहवालात असं म्हटलंय की हा प्लॅटफॉर्म चॅटजीपीटीसारखा आहे. पण नैतिकतेला धरून नाही. लोकांची ऑनलाइन फसवणूक करणे आणि त्याचा प्रचार करणे हा त्याचा उद्देश आहे.
मोठा धोका का होऊ शकतो?
रिपोर्टनुसार, वर्मजीपीटीमध्ये जनरेटिव्ह एआयचा वापर करण्यात आला आहे. जनरेटिव्ह एआय कोणतीही चूक न करता ईमेल तयार करू शकते. जे वाचल्यावर तो माणसाने लिहिला आहे असं वाटतं. विशेष बाब म्हणजे या प्लॅटफॉर्मची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की कमी ज्ञानी व्यक्तीही सायबर गुन्हे करू शकेल.
याहू फायनान्सच्या अहवालात याला चॅटजीपीटीचा सर्वात मोठा शत्रू म्हटले गेले आहे. ज्या संस्थापकांनी तो तयार केला आहे ते त्याचे सबस्क्रिप्शन मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत, ज्यामध्ये लोकांना सहज एंट्री मिळेल. त्याच्या सबस्क्रिप्शन मॉडेलची किंमत 5 हजार ते 55 हजार रुपयांपर्यंत असू शकते.
या प्लॅटफॉर्मशी 1500 युजर्स जोडले गेले असल्याचा दावा त्याच्या एका सदस्याने केला आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की यामुळे अनेक प्रकारचे धोके वाढू शकतात, अशा परिस्थितीत युजर्सने सतर्क राहण्याची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.