आज वर्ल्डवाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये अॅपलने आपले कित्येक नवीन प्रॉडक्ट आणि फीचर्स सादर केले. यामध्ये अॅपल वॉचसाठी नवीन सॉफ्टवेअरचीही घोषणा करण्यात आली. यामध्ये नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. या अपडेटमध्ये इमोशन ट्रॅकिंग फीचर देण्यात आलं आहेत ज्यामुळे मानसिक आरोग्यावर विशेष लक्ष देता येणार आहे.
काय आहेत फीचर्स?
अॅपल वॉचसाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टीम लाँच केली आहे. watchOS 10 असं या ऑपरेटिंग सिस्टीमचं नाव आहे. या अपडेटमध्ये कित्येक अॅप्स रिडिझाईन करण्यात आले आहेत. यासोबतच यूजर्सना या अपडेटमध्ये नवीन वॉच फेस देण्यात आले आहेत.
अॅपलने या अपडेटमध्ये वॉचचा (Apple Watch) इंटरफेस बदलला आहे. यामुळे आता अॅप्समधील नेव्हिगेशन आणखी सोपं झालंय. तर, यूजर्सना जी माहिती सर्वात महत्त्वाची आहे ती वॉचच्या स्क्रीनवर समोरच दिसणार आहे. यासाठी नवीन स्मार्ट स्टॅक देण्यात आलं आहे.
सायकलिंग करणाऱ्यांना फायदा
सायकलिंग करणाऱ्या व्यक्तींसाठी अॅपल वॉचमध्ये (Apple watchOS 10) आणखी फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये वर्कआउट रिमाईंडर, कॅलरीमेट्री, फॉल डिटेक्शन असे हे फीचर्स असणार आहेत. आयफोनवरील डिस्प्लेदेखील सायकलिंग करताना स्पीड, हार्ट रेट, रेस रूट, एलेव्हेशन अशा गरजेच्या गोष्टी दाखवण्यासाठी ऑप्टिमाईज करण्यात आला आहे. यामुळे तुम्ही आयफोन सायकलवर माउंट करून आरामात सर्व गोष्टींचा ट्रॅक ठेऊ शकता.
इमोशन ट्रॅकिंग
अॅपल वॉच आता केवळ तुमच्या शारीरिक नाही, तर मानसिक गोष्टींना देखील ट्रॅक करू शकेल. वॉचओएसच्या नवीन अपडेटमध्ये मूड आणि इमोशन ट्रॅकिंग हे फीचर्स देण्यात आले आहेत. यातील माइंडफुलनेस या अॅपच्या मदतीने यूजर्स त्यांच्या क्षणिक भावना आणि दैनंदिन मूड यांचा ट्रॅक ठेऊ शकतात. जेणेकरून कोणत्या गोष्टीचा त्यांच्या मनावर कसा परिणाम होतो याबाबत ते अधिक जागरूक होतील.
इतर फीचर्स
यासोबतच वॉचओएस 10 मध्ये आणखी काही अपडेट्स देण्यात आले आहेत. यामध्ये ऑफलाईन मॅप्स, फेसटाईम व्हिडिओ मेसेज वॉचवर पाहण्याची क्षमता, औषध घेण्याबाबतचे रिमाईंडर, आणि डेटा शेअर करण्यासाठी नेमड्रॉप फीचरचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.