Elon Musk : इलॉन मस्कला मिळाली गुड न्यूज! या देशात X प्लॅटफॉर्मवरील बंदी हटवली; सेवा पुन्हा सुरू, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

X Service Restored in brazil : ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने एलन मस्कच्या X प्लॅटफॉर्मवरील बंदी हटवली आहे.
Elon musk x restored in brazil
Elon musk x restored in brazilesakal
Updated on

Elon musk latest update : ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने एलन मस्कच्या X प्लॅटफॉर्मवरील बंदी हटवली आहे, कारण इलॉन मस्कने न्यायालयाच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत. गेल्या महिन्याभरापासून बंद असलेल्या X सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी न्यायालयाने अधिकृतरित्या मंजूर केले आहे.

ब्राझीलमध्ये X ची सेवा 30 ऑगस्ट रोजी बंद करण्यात आली होती. 21 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात X चे मोठे मार्केट असून, तिथे 20 ते 40 दशलक्ष युजर्स आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अलेक्झांड्रे डी मोरेस यांनी चुकीची माहिती पसरवणाऱ्या खात्यांना रोखण्यासाठी ही बंदी घातली होती.

Elon musk x restored in brazil
Laddu Mutya Baba: फिरता पंखा हातानं थांबवला अन् लड्डू मुत्त्या बाबाचं भांडं फुटलं; विज्ञानामुळं उलगडलं सत्य,व्हिडिओ पाहा

एलन मस्कने सुरुवातीला डी मोरेस यांच्यावर टीका करताना त्यांना "सत्ताधारी" आणि "सेंसरशिप करणारे" म्हटले होते. मात्र, अखेरीस मस्कने न्यायालयाच्या सर्व आदेशांचे पालन केले, ज्यात काही खात्यांना ब्लॉक करणे, थकबाकीच्या दंडाचे भरणे, आणि ब्राझीलमध्ये कायदेशीर प्रतिनिधी नेमणे यांचा समावेश होता.

Elon musk x restored in brazil
Galaxy A16: लवकरच Samsung Galaxy A16 घेणार भारताच्या स्मार्टफोन जगामध्ये एंट्री; एकदम खास कॅमेरा अन् फीचर्स झाले लिक

X ने आपल्या वक्तव्यात म्हटले की, "ब्राझीलमध्ये परत येऊन आम्हाला आनंद होत आहे. ब्राझीलच्या दशलक्ष नागरिकांना आमच्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश देणे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते."

ब्राझीलमध्ये X ची सेवा पुन्हा सुरू होण्याबरोबरच काही युजर्सनी Meta चे Threads किंवा Bluesky सारख्या इतर प्लॅटफॉर्मकडे आपला मोर्चा वळवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.