X ID Verification : 'एक्स' व्हेरिफिकेशन प्रक्रिया होणार अधिक सोपी! आता सरकारी डॉक्युमेंट दाखवून मिळेल ब्लू-टिक!

एक्सने याबाबत अधिकृत माहिती दिली नसली, तरी रिसर्चर निमा ओवजी यांनी याबाबत पोस्ट केली आहे.
X ID Verification
X ID VerificationeSakal
Updated on

एक्स, म्हणजेच ट्विटर हे अ‍ॅप विकत घेतल्यापासून इलॉन मस्कने यात वारंवार बदल केले आहेत. यूजर्सना मिळणाऱ्या सुविधा, फीचर्स यामध्ये मोठ्याप्रमाणात बदल करण्यात आलेले असून; आता लवकरच एक्स वर व्हेरिफिकेशन करण्याची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे.

एक्सवर ब्लू टिक मिळवण्यासाठी व्हेरिफिकेशन प्रक्रिया करणे गरजेचं आहे. यासाठी ट्विटरचं सबस्क्रिप्शन देखील घ्यावं लागतं. व्हेरिफिकेशनची सध्याची प्रक्रिया ही अगदी किचकट आहे. मात्र, आता ही प्रक्रिया सोपी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

X ID Verification
Musk Vs Zuck : 'तो या लढाईबाबत गंभीर नाही' मार्क झुकरबर्ग आणि इलॉन मस्कचा एकमेकांवर आरोप! आता पुढे काय होणार?

सरकारी आयडीने व्हेरिफिकेशन

तुमचं एक्स अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी आता केवळ तुम्हाला तुमचं सरकारी ओळखपत्र दाखवावं लागणार आहे. यामध्ये आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट अशा कोणत्याही डॉक्युमेंटचा समावेश होतो. एक्सने याबाबत अधिकृत माहिती दिली नसली, तरी रिसर्चर निमा ओवजी यांनी याबाबत पोस्ट केली आहे. (Elon Musk X)

निमा ओवजी हे एक स्वतंत्र रिसर्चर आणि ब्लॉगर आहेत. एक्स आणि इतर अशाच अ‍ॅप्सवर येणाऱ्या नवीन फीचर्सवर ते लक्ष ठेऊन असतात. त्यांनी आपल्या अकाउंटवरून ID Verification बाबत एक पोस्ट शेअर केली आहे. सोबतच याचा स्क्रीनशॉट देखील त्यांनी पोस्ट केला आहे.

X ID Verification
X Block Feature : 'एक्स'वरून लवकरच ब्लॉक फीचर हटणार; इलॉन मस्कने पोस्ट करत दिली माहिती

अशी आहे प्रक्रिया

निमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्स व्हेरिफिकेशन आता केवळ दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे. तुम्हाला सर्वात आधी तुमच्या आयडीचा फोटो अपलोड करावा लागेल, आणि मग त्या आयडीसोबत एक लाईव्ह सेल्फी घ्यावा लागेल. यानंतर पेमेंट केल्यानंतर लगेच तुमचं अकाउंट व्हेरिफाईड होईल.

व्हेरिफाईड यूजर्स वाढवण्यासाठी निर्णय

व्हेरिफाईड यूजर्सची संख्या वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला गेला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोबतच, अशा प्रकारे व्हेरिफिकेशन झाल्यावर एक्स प्लॅटफॉर्मवरील बॉट्स आणि स्पॅम अकाउंट्सची संख्या कमी होणार आहे.

X ID Verification
X Ads Revenue : 'एक्स'वरुन पैसे कमावणं आता आणखी सोपं! नियमांमध्ये केले मोठे बदल; इलॉन मस्कची घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.