लॉंच आधीच Xiaomi 12 चे स्पेसिफिकेशन्स लीक, जाणून घ्या डिटेल्स

Xiaomi 12 series
Xiaomi 12 series
Updated on

Xiaomi 12 series Launch : Xiaomi 12 सीरीज चीनमध्ये 28 डिसेंबरला म्हणजेच उद्या लॉन्च होणार आहे. या सीरीज मध्ये Xiaomi 12, Xiaomi 12X, Xiaomi 12 Pro आणि Xiaomi 12 Ultra स्मार्टफोनचा समावेश असू शकतो. मात्र लॉन्च होण्यापूर्वी, वनीला Xiaomi 12 स्मार्टफोनचे सर्व प्रमुख स्पेसिफिकेशन्स ऑनलाइन लीक झाले आहेत. लीकनुसार, या फोनमध्ये 20-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. फोन Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात येईल, ज्यामध्ये LPDDR5 RAM आणि UFS 3.1 स्टोरेज उपलब्ध असेल. तसेच, फोनमध्ये 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.

Xiaomiui च्या लेटेस्ट रिपोर्टमध्ये या Xiaomi 12 स्मार्टफोनच्या सर्व फीचर्सची माहिती लीक झाली आहे. लीकनुसार, फोन Android 12 आधारित MIUI 13 वर चालू शकतो. यात 120Hz रिफ्रेश रेट, 20:9 आस्पेक्ट रेशो, 419ppi पिक्सेल डेंसिटी, HDR10+ आणि 1500 nits पीक ब्राइटनेससह 6.28-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले असेल. डिस्प्लेमध्ये गोरिल्ला व्हिक्टस ग्लास प्रोटेक्शन उपलब्ध असेल.

याशिवाय, फोन Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज असेल, 12 GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256 GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज देण्यात येईल. रिपोर्टनुसार, हा स्मार्टफोन तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला जाईल, ज्यामध्ये 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज, 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज उपलब्ध असतील.

Xiaomi 12 series
WhatsApp ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट; मद्रास हायकोर्टाचा Admin ला दिलासा

फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असू शकतो. त्याच वेळी, 3x ऑप्टिकल झूमसह 13-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड लेन्स आणि 32-मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स दिले जातील. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 20-मेगापिक्सल कॅमेरा दिला जाईल. त्यासोबत फोनची बॅटरी 4,500mAh आहे, ज्यामध्ये 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. तसेच, 30 W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आणि 10 W रिव्हर्स वायरलेस चार्जिंग फोनमध्ये आढळू शकते.

Xiaomi 12 series
Google Maps फक्त रस्ते सांगत नाही, जाणून घ्या इतरही भन्नाट फीचर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.