Xiaomi ची नवीन स्मार्टफोन सीरीज Xiaomi 12 लवकरच भारतात लॉन्च होईल. दरम्यान या सीरीजचा पहिला स्मार्टफोन Xiaomi 12 Pro असेल. याची किंमत काय असेल असा प्रश्न जर का तुम्हाला पडला असेल तर हा फोन लॉन्च होण्यापूर्वीच Xiaomi 12 Pro स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर..
लीक झालेल्या रिपोर्टनुसार, Xiaomi 12 Pro स्मार्टफोन भारतात 2022 च्या पहिल्या तिमाहीत लॉन्च केला जाईल. म्हणजे फोन एप्रिल 2022 पर्यंत लॉन्च केला जाऊ शकतो. Xiaomi 12 सीरीज अंतर्गत Xiaomi 12 आणि Xiaomi 12X हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले जाणार आहेत. पण Xiaomi 12X च्या लॉन्चबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.
संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Xiaomi 12 Pro स्मार्टफोन 6.73 इंच AMOLED LTPO डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो. हा फोन फुल एचडी प्लस रिझोल्यूशनसह लॉंच केला जाईल. फोनच्या स्क्रीन रिझोल्यूशनला 120Hz रिफ्रेश रेट दिला जाईल. फोन अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सपोर्ट ऑफर केला जाण्याची शक्यता आहे. Xiaomi 12 Pro स्मार्टफोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शनसह येईल. Xiaomi 12 Pro स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल तर फोनच्या मागील पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. त्याचा मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा असेल. याशिवाय 50 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 5 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स दिली जाणार आहेत.
किंमत किती असेल?
Xiaomi 12 Pro स्मार्टफोन भारतात 4,699 युआन (सुमारे 55,550 रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो. या किंमतीसह, Xiaomi 12 Pro थेट OnePlus 10 Pro शी स्पर्धा करेल.
Xiaomi 12 Pro स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 1 चिपसेट असेल. फोन 8 GB आणि 12 GB LPDDR5 रॅम तसेच 256 GB UFS 3.1 स्टोरेज सपोर्टसह येईल. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000mAh बॅटरी सपोर्ट दिला जाईल. फोन 120W फास्ट चार्जिंग, 50W वायरलेस आणि 10W रिव्हर्स वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येईल. फोन JBL ड्युअल स्टीरिओ स्पीकर सपोर्ट देखील देण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.