Xiaomi चा सब-ब्रँड Redmi लवकरच भारतात नवीन 5G बजेट स्मार्टफोन सादर करू शकतो. मिडीया रिपोर्ट्सनुसार, कंपनी भारतात Redmi 11 Prime 5G सादर करण्याच्या तयारीत आहे. हा हँडसेट चीनमध्ये लॉन्च झालेल्या Redmi Note 11E 5G चा रीब्रँड केलेला व्हेरिएंट असल्याची सांगण्यात येत आहे. काही आठवड्यांपूर्वी, Note 11E 5G भारतात POCO M4 5G म्हणून काही किरकोळ बदलांसह सादर करण्यात आला होता. जाणून घ्या तुमच्यासाठी या फोनमध्ये काय खास असेल:
XiaomiUI ने दावा केला आहे की Redmi 11 Prime 5G कोडनेम असलेले 'Lite' मॉडेल क्रमांक 22041219I भारतात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. भारतात, Redmi 11 Prime ची किंमत सुमारे 12,000 रुपयांच्या आत असण्याची अपेक्षा आहे. तसेच हा डिव्हाइस Flipkart आणि Mi.com द्वारे खरेदीसाठी उपलब्ध असेल.
Redmi 11 Prime 5G भारत लॉन्चची तारीख आणि स्पेसिफिकेशन्स
Redmi 11 Prime 5G लवकरच भारतात दाखल होईल. कंपनीने अद्याप लॉन्चची तारीख जाहीर केलेली नाही. हा एक बजेट स्मार्टफोन आहे हे लक्षात घेता, कंपनी या महिन्याच्या अखेरीस याची घोषणा करू शकते. या फोनची फीचर्स Redmi Note 11E 5G मॉडेलसारखीच राहतील. फोनमध्ये साइड-माउंट केलेले फिंगरप्रिंट स्कॅनर, AI फेस अनलॉक, वॉटर-ड्रॉप नॉच, एक प्लास्टिक फ्रेम आणि 18W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी मिळणार आहे.
भारतात लवकरच येणार असल्याच्या Redmi 11 Prime 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.58-इंच फुल HD+ IPS LCD पॅनेल असेल. तसेच या फोनला MediaTek Dimensity 700 SoC चा सपोर्ट असेल आणि 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह येईल. फोनच्या मागील बाजूस ड्युअल-कॅमेरा सेटअप असेल ज्यामध्ये 50MP मुख्य लेन्स आणि 2MP दुसरा सेन्सर असेल. सेल्फीसाठी समोर 5MP स्नॅपर असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.