Airtel 5G: शाओमी इंडिया-एअरटेलमध्ये भागीदारी, ग्राहकांना मिळणार बेस्ट 5G सेवा

xiaomi india partners with airtel for a seamless 5g experience on all xiaomi 5g phones
xiaomi india partners with airtel for a seamless 5g experience on all xiaomi 5g phones
Updated on

स्मार्टफोन ब्रँड Xiaomi India आणि दूरसंचार कंपनी Bharti Airtel यांनी बुधवारी 5G Plus सुधारण्यासाठी भागीदारी केली आहे. आता Xiaomi आणि Redmi स्मार्टफोन वापरकर्त्यांना पूर्वीपेक्षा चांगली Airtel 5G सेवा मिळणाक आगे. वापरकर्ते आता अखंड व्हिडिओ कॉलिंग, क्लाउडवर लॅग फ्री गेमिंग आणि Xiaomi आणि Redmi 5G मॉडेल्सवर हाय स्पीड डेटा अपलोड आणि डाउनलोडचा लाभ घेऊ शकतात.

अल्ट्राफास्ट एअरटेल 5G प्लस कनेक्टिव्हिटीचा आनंद घेण्यासाठी, वापरकर्त्यांना फक्त त्यांच्या फोनच्या नेटवर्क सेटिंग्जवर जाऊन त्यांचे पसंतीचे नेटवर्क Airtel 5G निवडणे आवश्यक आहे. Xiaomi India आणि Bharti Airtel त्‍याची मागील दोन वर्षांपासून अनेक उत्‍पादनांवर एकत्रित चाचणी करत आहेत. या चाचणीद्वारे, दोन्ही कंपन्यांनी चांगले परिणाम साध्य करण्यासाठी अडचणीच्या काळात परफॉर्मंस आणि स्थिरतेला प्राधान्य दिले आहे.

या भागीदारीच्या घोषणेदरम्यान, Xiaomi इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी अनुज शर्मा म्हणाले की, Xiaomi इंडियाने नेहमीच लोकांसाठी तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण केले आहे. आमच्या वापरकर्त्यांच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

तसेच शर्मा म्हणाले की आमचे सर्व 5G स्मार्टफोन संपूर्ण भारतातील आमच्या वापरकर्त्यांना 5G सेवा प्रदान करण्यास सक्षम आहेत. Airtel सोबतच्या आमच्या भागीदारीत, वापरकर्त्यांना बेस्ट-इन-क्लास तंत्रज्ञान मिळेल, जे आमच्या वापरकर्त्यांना भारतातील 5G ​​क्रांतीमध्ये आघाडीवर राहण्यास मदत करेल.

xiaomi india partners with airtel for a seamless 5g experience on all xiaomi 5g phones
Flipkart Big Diwali Sale: दिवाळीत स्वस्तात खरेदी करा स्मार्ट टीव्ही, मिळतेय भरघोस सूट

Xiaomi च्या या स्मार्टफोन्समध्ये मिळेल 5G सेवा

Xiaomi India ने वापरकर्त्यांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी विविध फ्रिक्वेन्सी बँडवर अनेक शहरांमध्ये 5G फील्ड ट्रायल आयोजित केल्या आहेत. Xiaomi 12 Pro, Mi 11 Ultra, Xiaomi 11T Pro, Xiaomi 11 Lite NE 5G, Xiaomi 11i हायपरचार्ज, Xiaomi 11i, Mi 11X Pro, Mi 11X, Mi 10T Pro, Mi 10T यासारखे Xiaomi डिव्हाइस आणि Mi 10T यूजर्स देखील नेटवर्क बदलून अल्ट्राफास्ट कनेक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकता

परवडणाऱ्या मोबाईल फोन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Redmi K50i, Redmi 11 Prime 5G, Redmi Note 11 Pro+ 5G, Redmi Note 11T 5G, आणि Redmi Note 10T 5G स्मार्टफोन्सना Airtel 5G Plus सेवेचा लाभ मिळेल.

xiaomi india partners with airtel for a seamless 5g experience on all xiaomi 5g phones
Galaxy M32 Prime Edition: सॅमसंगने लॉन्च केला 20MP सेल्फी कॅमेरा असलेला फोन; किंमतही परवडेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()