रेडमीचा 8GB रॅम असलेला 5G स्मार्टफोन मिळतोय स्वस्तात; पाहा डिटेल्स

Redmi Note 11T 5G
Redmi Note 11T 5GGoogle
Updated on

कमी किमतीत दमदार फीचर्स ऑफर केले जात असल्याने Xiaomi कंपनीचे फोन भारतात खूपच लोकप्रिय आहेत. तसेच कंपनी ग्राहकांसाठी दररोज नवनवीन ऑफर देखील देते. दरम्यान, जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या Redmi Note 11T 5G हा फोन तुम्हाला सवलतीत खरेदी करता येणार आहे. सध्या Xiaomi च्या Redmi Note 11T 5G च्या 6GB / 64GB व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे, 6GB / 128GB व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये असून त्याच्या टॉप व्हेरिएंट 8GB/128GB ची किंमत 19,999 रुपये आहे.

सध्या हे स्मार्टफोन 1000 रुपयांनी स्वस्तात उपलब्ध करून दिला जात आहेत. Mi.com कडून मिळालेल्या माहितीनुसार, सिटी बँक क्रेडिट कार्ड अंतर्गत 1,000 रुपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. याशिवाय Mi Exchange अंतर्गत फोनवर 15,500 रुपयांची बचत केली जाऊ शकते.

Redmi Note 11T 5G मध्ये 6.6-इंचाचा फुल-एचडी + डिस्प्ले दिला असून ज्याचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे आणि त्याचा अॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट 90 Hz आहे. याच्या डिस्प्लेमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन उपलब्ध आहे.

फोन ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 810 SoC आहे तसेच यामध्ये Mali-G57 MC2 GPU आणि 8GB पर्यंत LPDDR4X रॅम देण्यात आली आहे. मल्टीटास्किंगसाठी 3GB पर्यंत अतिरिक्त RAM जोडण्यासाठी फोनचे इंटरनल स्टोरेज वापरले जाते. हा फोन स्टारडस्ट व्हाईट, एक्वामेरीन ब्लू आणि मॅट ब्लॅक कलर वेरिएंटमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.

Redmi Note 11T 5G
Jio चा सगळ्यात स्वस्त प्लॅन, 400 पेक्षा कमीत 84 दिवस व्हॅलिडिटी

Redmi Note 11T 5G फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यात 50-मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर आणि अल्ट्रा-वाइड शूटरचा 8-मेगापिक्सेल कॅमेरा f/1.8 लेन्ससह आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

पॉवरसाठी, Redmi Note 11T 5G मध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली असून ती 33W प्रो फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. फोनची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर दोन दिवस चालेल असा दावा करण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5.1, GPS/A-GPS, इन्फ्रारेड (IR), USB Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Redmi Note 11T 5G
'बुली बाई' नंतर हिंदू महिला टार्गेट; सरकारकडून टेलिग्राम चॅनल ब्लॉक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.