Redmi K60 Series Details: शाओमीने काही दिवसांपूर्वीच Redmi K60 स्मार्टफोन सीरिजला लाँच केले आहे. चीनमध्ये लाँच झालेल्या या सीरिजला ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या सीरिजमध्ये Redmi K60, Redmi K60 Pro आणि Redmi K60 E स्मार्टफोनचा समावेश आहे. १ जानेवारीला या स्मार्टफोनच्या पहिल्या सेलचे आयोजन करण्यात आले होते.
पहिल्याच सेलमध्ये या स्मार्टफोन्सला ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या ५ मिनिटात या सीरिजच्या ३ लाख स्मार्टफोन्सची विक्री झाली आहे. पहिल्या सेलमध्ये Redmi K60 आणि Redmi K60 Pro विक्रीसाठी उपलब्ध होते.
Redmi K60 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
Redmi K60 फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. फोन ६.६७ इंच QHD+ AMOLED पॅनेल दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आणि टच सँपलिंग रेट ४८० हर्ट्ज आहे. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, यात ६४ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सल मॅक्रो सेंसर देण्यात आला आहे.
सेल्फीसाठी फ्रंटला १६ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. यात Adreno GPU सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ प्लस जनरेशन १ चिपसेटचा सपोर्ट मिळतो. तर पॉवर बॅकअपसाठी ६७ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५५०० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल.
K60 Pro च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर यामध्ये ६.६७ इंच २के १२ बिट एमोलेड फ्लॅट डिस्प्ले देण्यात आला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज, पीक ब्राइटनेस १४०० निट्स आहे. यात HDR10+, डॉल्बी व्हिजन आणि 1920Hz PWM हाय-फ्रीक्वेंसी डिमिंग सपोर्ट मिळेल.
हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.