'Y2K' सारखंच संकट पुन्हा येणार? 'INDIA'चं 'BHARAT' झाल्यानंतर भारतीय वेबसाईट्स बंद होतील का? जाणून घ्या

INDIA-BHARAT Controversy : 'INDIA'चं 'BHARAT' झाल्यानंतर '.in' डोमेनच्या वेबसाईट्सचं काय होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
INDIA-BHARAT Controversy
INDIA-BHARAT ControversyeSakal
Updated on

1999 सालाच्या शेवटी जगावर एक मोठं संकट येईल असं सर्वांना वाटत असेल. 2000 हे वर्ष उजाडल्यानंतर जगभरातील कम्प्युटर सिस्टीम क्रॅश होतील, अशी भीती सर्वांना वाटत होती. याला कारण म्हणजे, कम्प्युटर सिस्टीम इतर वर्षाच्या आकड्यांमधील शेवटचे दोन अंक समजून घेऊ शकत होत्या. मात्र, 2000 या वर्षातील शेवटचे दोन अंक 00 असल्यामुळे सिस्टीमला ते समजणार नाही, आणि त्या क्रॅश होतील असं सर्वांना वाटत होतं.

सध्या भारतातही अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशाचं नाव बदलण्याच्या अफवा सगळीकडे पसरत आहेत. त्यामुळे 'INDIA'चं 'BHARAT' झाल्यानंतर '.in' डोमेनच्या वेबसाईट्सचं काय होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या वेबसाईट्स क्रॅश होण्याची भीती सर्वांना वाटत आहे.

INDIA-BHARAT Controversy
India Vs Bharat Name Controversy : इंडिया नाव बदलणार ही केवळ अफवा, मात्र...; केंद्राचं स्पष्टीकरण

प्रत्येक देशाचं असतं TLD

प्रत्येक देशाचं एक टॉप लेव्हल डोमेन, म्हणजेच TLD असतं. हे काय असावं याचा निर्णय तो देशच घेत असतो. हे दोन अक्षरी डोमेन असतं, जे त्या देशाची ओळख बनतं. भारताचं TLD हे '.in' आहे. तसंच अमेरिकेचं '.us', युनायटेड किंगडमचं '.uk' आणि जर्मनीचं '.de'. जर एखाद्या देशाने आपलं नाव बदललं, तर त्याचं TLD बदलायचं की नाही हा त्या देशाचा निर्णय असतो.

TLD बदलल्याने काय होईल?

एखाद्या देशाने आपलं TLD बदलल्यानंतर अर्थातच त्याच्या जुन्या डोमेन आयडीवर असणाऱ्या सर्व वेबसाईट्सना आपलं डोमेन नेम अपडेट करावं लागेल. ही प्रक्रिया किचकट, खर्चिक आणि वेळखाऊ असणार आहे. यासाठी लागणाऱ्या वेळेदरम्यान नवीन आणि जुने दोन्ही डोमेन नेम सुरू ठेवावे लागतील.

INDIA-BHARAT Controversy
India vs Bharat : राजपत्रावर 'इंडिया' ऐवजी 'भारत'! CM शिंदेंकडून 'भारत माता की जय' म्हणत बदलाचे स्वागत

ट्विटरचं नाव बदलून जेव्हा एक्स करण्यात आलं, तेव्हा ज्याप्रमाणे एक्स.कॉम ही वेबसाईट ट्विटरवर रिडायरेक्ट होत होती. त्याचप्रमाणे काही काळ जुनं डोमेन नेम नवीनवर रीडायरेक्ट करण्याचा पर्यायही कंपन्यांना उपलब्ध करावा लागेल. शिवाय ही सर्व प्रक्रिया जागतिक स्तरावर होणं गरजेचं आहे.

डोमेन नेम तेच राहण्याची शक्यता

अर्थात, एखादा देश नाव बदलल्यानंतरही आपलं TLD जुनंच ठेवण्याचा निर्णयही घेऊ शकतो. उदाहरणार्थ, Czech Republic देशाने आपलं नाव Czechia असं केल्यानंतर देखील आपलं TLD हे पूर्वीप्रमाणेच .cr असं ठेवलं होतं.

INDIA-BHARAT Controversy
वंदे मातरम् म्हणत India Vs Bharat वादात अभिनेते मनोज जोशींची उडी, विशेष गाणं गाऊन जाहीर केलं मत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.