Year Ender 2021 : पाहा गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या टॉप 5 SUV

top five most searched suvs on google in 2021
top five most searched suvs on google in 2021Google
Updated on

top five most searched suvs on google in 2021 : भारतात सध्या एसयूव्ही (SUV) गाड्यांना खूप पसंती दिली जात आहे. या गाड्यांना अनेक महिन्यांची वेटींग सध्या सुरू आहे. चिपचा तुटवडा आणि कोविडची (Covid 19) दुसरी लाट यासारखे आव्हान असूनही, कार कंपन्यांनी नवीन कार बाजारात लॉंच केल्या आहेत. भारतीय बाजारात अनेक SUV गाड्या लॉंच झाल्या आहेत, ज्यांना ग्राहकांमध्ये मोठी मागणी आहे. इंडीया कार न्यूजच्या डेटानुसार, 2021 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या 5 एसयूव्ही कार्सबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

किआ सेल्टोस (Kia Seltos)

Kia Seltos 2021 मध्ये Google वर 8.2 लाख मंथली अव्हरेज सर्चसह या चार्टमध्ये आघाडीवर आहे. Kia Seltos च्या फीचर्स बद्दल सांगायचे तर Kia Seltos SUV 3 वेगवेगळ्या इंजिन पर्यायांमध्ये येते - 1.5 लिटर पेट्रोल, 1.4 लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल. ही इंजिने 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेली आहेत. याशिवाय, ते ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये देखील उपलब्ध आहेत. कंपनीचा दावा आहे की त्याचे पेट्रोल इंजिन व्हेरिएंट हे 16 kmpl आणि डिझेल व्हेरिएंट 21 kmpl पर्यंत मायलेज देते.

महिंद्रा थार (Mahindra Thar)

जबरदस्त लुक असलेली महिंद्रा थार ही या वर्षी गुगलवर सर्वाधिक शोधली जाणारी दुसरी एसयूव्ही आहे ज्याचे मंथली अव्हरेज 6.7 लाखांहून अधिक आहे. महिंद्र थारचे 2 ट्रिम लेव्हलमध्ये 10 व्हेरिएंट आहेत. भारतातील 4 सीटर SUV महिंद्रा थारची किंमत 12.78 लाख ते 15.08 लाख रुपये आहे. हे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. 6 कलर ऑप्शन असलेली महिंद्र थारचे मायलेज 15.2 kmpl पर्यंत आहे. AX(O) आणि LX सारख्या दोन ट्रिम लेव्हलच्या 10 व्हेरिएंटमध्ये थार बाजारात लाँच करण्यात आली आहे.

top five most searched suvs on google in 2021
Jio चा 'हॅपी न्यू इयर 2022' प्लॅन, 365 दिवस मिळाणार खास बेनिफिट्स

टाटा नेक्सॉन Tata Nexon

Tata Nexon भारतात 7.28 लाख ते 13.23 लाख रुपये किंमतीच्या रेंजमध्ये सादर करण्यात आली आहे. Tata Nexon XE, XM, XZ, XZ+ आणि XZ+(O) या 5 ट्रिम लेव्हलच्या 44 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. डिझेल आणि पेट्रोल तसेच मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांमध्ये ऑफर केलेल्या, SUV चे मायलेज 21.5 kmpl पर्यंत आहे.

किआ सोनेट (Kia Sonet)

Kia Sonet 6.7 लाखांहून अधिक मंथली अव्हरेज सर्चसह, सोनेट 2021 मध्ये Google वर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या टॉप पाच SUV च्या यादीत देखील आहे. Kia Sonet ची भारतातील किंमत 6.71 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये 30 पेक्षा जास्त सेगमेंट फर्स्ट फीचर्स उपलब्ध आहेत. Kia Sonet मध्ये दोन पेट्रोल इंजिन पर्याय आहेत, 1.2L आणि 1.0L Turbo GDI. डिझेल इंजिन पर्याय 1.5 L CRDi WGT आणि 1.5 L CRDi VGT आहेत. दोन्ही इंजिन BS6 कंप्लयंट आहेत. ट्रान्समिशन ऑप्शनमध्ये 5 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड ऑटोमॅटिक आणि 7 स्पीड डीसीटी देण्यात आले आहेत. सोबत 6-स्पीड इंटेलिजेंट मॅन्युअल ट्रान्समिशन (IMT) तंत्रज्ञान देखील आहे. डिझेल इंजिन 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे, जे फर्स्ट इन क्लास फीचर आहे.

top five most searched suvs on google in 2021
एका चार्जवर धावतात 100 किमी; पाहा देशातील काही दमदार ई-स्कूटर्स

टाटा पंच (Tata Punch)

टाटा पंच 6.7 लाखांहून अधिक मा मंथली अव्हरेज सर्च असलेली ही मायक्रो SUV 2021 मध्ये Google वर सर्वाधिक शोधली जाणारी पाचवी SUV आहे. 1199 सीसी टाटा पंचची किंमत 5.5 लाख रुपयांपासून सुरु होते. या किमतीच्या रेंजमध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्ही देऊन तरुणांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने टाटाने ही कार लॉन्च केली आहे. टाटा पंच कार एगिल लाइट फ्लेक्सिबल अॅडव्हान्स्ड आर्किटेक्चर प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. हे डिझाईन इम्पॅक्ट 2.0 डिझाइन लँग्वेज अंतर्गत तयार करण्यात आले आहे. टाटा पंचची किंमत 5.49 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 9.39 लाख रुपयांपर्यंत जाते. टाटा पंचच्या पेट्रोल व्हर्जनची किंमत 5.49-9.39 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

top five most searched suvs on google in 2021
एक लिटर पेट्रोलमध्ये धावतात 26 किमी; पाहा देशातील टॉप मायलेज कार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.