New Year 2022 : 2021 जवळजवळ संपले असून आपण सर्वजण 2022 स्वागताला सगळेजण सज्ज झालो आहोत, येत्या नवीन वर्षात टेक प्रेमींसाठी सॅमसंगच्या फ्लॅगशिप Galaxy S-सिरीजसह आणि OnePlus, Xiaomi, Realme आणि इतरही काही ब्रँड्ससह Apple iPhone देखील लॉंच होणार आहेत. पुढील वर्षात लॉंच होणार असलेल्या काही खास फोन्सवर आपण एक नजर टाकूयात..
1. Samsung Galaxy S21 FE - हा स्मार्टफोन या वर्षी अनेक लॉन्च होणार असल्याची अफवा होती, पण ती पुर्ण झाली नाही सॅमसंगच्या Galaxy S21 सीरीजची टोन्ड-डाउन आवृत्ती आता पुढील दोन आठवड्यांत कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES) 2022 मध्ये लॉन्च केली जाईल असे सांगितले जात आहे. रिपोर्टनुसार की Samsung Galaxy S21 FE क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट आणि 120Hz डिस्प्लेसह लॉन्च केला जाईल.
2. Samsung Galaxy S22 Series - दरवर्षी प्रमाणे Samsung Galaxy S22 सीरीज आणखी एक दमदार सॅमसंग गॅलेक्सी S-सिरीज फ्लॅगशिप स्मार्टफोन्स लॉंच होणार आहे. Samsung Galaxy S22 सीरीज देखील 2022 मध्ये लवकरच लॉंच करण्यात येईल आणि माजी अनेक अपडेट देण्यात येतील असे म्हटले आहे. व्हॅनिला Samsung Galaxy S22 आणि Galaxy S22+ बद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही, मात्र Samsung Galaxy S22 Ultra खूप चर्चेत आहे. स्मार्टफोन वेगळ्या-आकाराच्या कॅमेरा मॉड्यूलसह लॉंच होईल असे म्हटले जात आहे, आणि यामध्ये सॅमसंग गॅलेक्सी नोट सिरीज प्रमाणे S-पेन स्लॉट देखील असू शकतो.
3. OnePlus 10 Series- सॅमसंगच्या Galaxy S Series मधिल फ्लॅगशिप स्मार्टफोन्सप्रमाणे, OnePlus चे फ्लॅगशिप फोन देखील दरवर्षी अपेक्षित असलेले स्मार्टफोन आहेत. OnePlus 10 Pro मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात येत असल्याची अफवा असून Oppo आणि OnePlus च्या विलीनीकरणामुळे, पुढील फ्लॅगशिप फोनसह OnePlus स्मार्टफोनमध्ये सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या दोन्ही बाबतीत काय बदल होतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
4. iPhone 14 - दरवर्षीच आयफोन लॉंचची लोक वाट पाहतात, आयफोन 14 सीरीज बद्दल देखील अशीच उत्सुकता लोकांमध्ये आतापासून पाहायला मिळत आहे. या फोनबद्दल आत्तापासूनच अफवा येऊ लागल्या आहेत. iPhone 14 सीरीज कदाचित Apple च्या A16 बायोनिक चिपद्वारे समर्थित असेल आणि त्यामध्ये 2TB पर्यंत स्टोरेज, Wi-Fi 6E आणि अधिक सुधारणांसह येईल असे म्हटले जाते.
5. iPhone SE 3 - वापरकर्त्यांना अधिक परवडणारा आयफोन देण्यासाठी कंपनीने iPhone SE (2020) लॉंच केला आहे. 2022 मध्ये कंपनी क्युपर्टिनो-आधारित आपला तिसरा परवडणारा iPhone, iPhone SE 3 आणणार आहे, जो iPhone XR वर आधारित असेल . हा स्मार्टफोन 5G कनेक्टिव्हिटीसह येईल आणि या वर्षीच्या Apple A15 Bionic चिपसेट सपोर्ट याला दिला जाईल.
6. Xiaomi 12 Series - ही सीरीज चीननंतर भारतात देखील लॉंच करण्यात येणार आहे. Xiaomi 12 सीरीजमध्ये Xiaomi 12, Xiaomi 12 Pro आणि Xiaomi 12X चा समावेश आहे. Xiaomi 12 आणि Xiaomi 12 Pro Qualcomm च्या लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 चिपसेट सपोर्ट यात देण्यात आला आहे, तर Xiaomi 12X Qualcomm Snapdragon 870 SoC द्वारे समर्थित आहे. तिन्ही स्मार्टफोन्स ट्रिपल रिअर कॅमेरे आणि इतर फ्लॅगशिप-लेव्हल स्पेसिफिकेशन्स जसे की 5G, Wi-Fi 6E सह येतात.
7. Pixel 6 A - पिक्सेल 6 नंतर Google स्वतःची चिप वपरलेला एक टोन्ड डाऊन पिक्सेल 6 सीरीज व्हर्जन लॉंच करेल पिक्सेल पुढील वर्षी पिक्सेल 6 A लॉंच करेल . Pixel 6A बद्दल आत्तापर्यंत फारशी माहिती मिळालेली नाही, परंतु अफवा अशी आहे की Google च्या Tensor चिपद्वारे देखील समर्थित असेल आणि Pixel 6 आणि Pixel 6 Pro मध्ये AI क्षमता असतील.
8. Realme GT 2 Series - BBK इलेक्ट्रॉनिक्स- सपोर्टेड ब्रँडकडून Realme GT 2 सीरीज पुढील वर्षीच्या सुरुवातीला लॉंच करण्यात येईल असे म्हटले जाते. दोन्ही Realme जीटी 2 आणि Realme जीटी 2 प्रो लॉंच कंपनीने कंनफर्म केले आहेत आणि हे आतापर्यंतचे सर्वात स्मार्टफोन्स असतील असा दावा केला जात आहे.तसेत Realme GT 2 प्रो ला एक नवे डिझाईन मिळण्याची देखील शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.