नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. 2022 हे वर्ष भारतात 5G कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने महत्त्वाचे वर्ष होते. भारतात 1 ऑक्टोबर रोजी 5G सेवा सुरू करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC 2022) च्या सहाव्या आवृत्तीत 5G सेवा सुरू केली.
देशात 5G सेवा सुरू झाल्यानंतर स्मार्टफोन बाजारात 5G स्मार्टफोन्सची मागणीही वाढली आहे. स्मार्टफोन कंपन्यांनी गेल्या दोन वर्षांपासून अनेक 5G स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, परंतु आता चांगल्या फीचर्ससह 5G फोन कमी किमतीत बाजारात आले आहेत.
तुम्हीही कमी किंमतीत 5G फोन शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण या वर्षी लॉन्च झालेल्या भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोनबद्दल जाणून घेणार आहोत.
Lava Blaze 5G
लावा ब्लेझ 5G हा भारतातील सर्वात कमी किमतीचा 5G स्मार्टफोन आहे. Lava Blaze 5G ची किंमत 9,999 रुपये आहे. फोनमध्ये 6.5-इंचाचा HD Plus IPS डिस्प्ले आणि 90 Hz चा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. फोनसोबत साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर व्यतिरिक्त, फेस अनलॉक देखील दिले आहे.
Lava Blaze 5G ला MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आणि 5000 mAh बॅटरीचा सपोर्ट मिळतो. याशिवाय, फोनमध्ये तीन रियर कॅमेरे आहेत ज्यात प्रायमरी लेन्स 50 मेगापिक्सेल आणि दुसरी लेन्स AI आहे. फोनच्या फ्रंटला 8-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.
Samsung Galaxy M13 5G
Samsung Galaxy M13 5G हा फोन 13,999 रुपयांच्या च्या किमतीत खरेदी करता येईल. Samsung Galaxy M13 5G ला Android 12 सह One UI 4 मिळतो. फोनमध्ये 6.5-इंचाचा HD Plus डिस्प्ले आणि 90 Hz रिफ्रेश रेट आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आणि 4 GB RAM सह 64 GB स्टोरेज मिळते.
फोन ड्युअल कॅमेरा सेटअप सह येतो. फोनमध्ये 50-मेगापिक्सलची प्रायमरी लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000 mAh बॅटरी आणि 15 वॉट चार्जिंग सपोर्ट मिळतो.
Poco M4 5G
Poco चा हा फोन यावर्षी एप्रिलमध्ये लॉन्च झाला होता. हा फोन 12,999 रुपये किमतीत सादर करण्यात आला आहे. Poco M4 5G सह Android 12 आधारित MIUI 13 आहे. यात 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 1080x2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.58-इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षण देखील उपलब्ध असेल. Poco च्या या फोनमध्ये तुम्हाला MediaTek Dimensity 700 प्रोसेसरसह 6 GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंत स्टोरेज मिळेल.
यासह, 2 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम देखील उपलब्ध होईल. Poco M4 5G मध्ये दोन मागील कॅमेरे आहेत ज्यात प्राथमिक लेन्स 50 मेगापिक्सेल आहे. दुसरी लेन्स 2 मेगापिक्सेल पोर्ट्रेट आहे. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000 mAh बॅटरी असून 18W फास्ट चार्जिंग उपलब्ध आहे. सुरक्षेसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
iQoo Z6 5G
iQoo Z6 5G हा फोन तुम्ही 13,999 रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आला आहे. या फोनमध्ये 6 GB पर्यंत रॅमसह 128 GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. फोनमध्ये 6.58-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. IQ Z6 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर आणि 5000 mAh बॅटरी सपोर्ट देखील यामध्ये आहे.
iQoo Z6 5G ला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो, जो प्रायमरी लेन्स 50 मेगापिक्सेल, 2 मेगापिक्सेल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरसह येतो. तसेच, फोनमध्ये 18W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट दिला आहे.
Redmi 11 Prime 5G
हा Redmi फोन या वर्षी सप्टेंबरमध्ये 3,999 रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता. हा फोन मिडो ग्रीन, क्रोम सिल्व्हर आणि थंडर ब्लॅक कलर पर्यायांमध्ये येतो. फोनसोबत 6.58-इंचाचा फुल एचडी प्लस IPS डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये Octacore MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी Mali-G57 सपोर्ट दिला आहे.
फोनमध्ये 6 GB RAM सह 128 GB UFS 2.2 स्टोरेज मिळते. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध असून यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेल आणि दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सेल आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे. फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी आहे आणि 18W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.