रुबाबदार Yezdi च्या तीन बाईक्स भारतात लाँच, जाणून किंमती अन् फिचर्स

येझ्दी बाईक्सची भारतात तब्बल २६ वर्षानंतर घर वापसी झाली आहे. कंपनीने नवीन लूक आणि डिझाईनसह लाँच केले आहे.
Yezdi Bikes
Yezdi Bikes esakal
Updated on

नवी दिल्ली : क्लासिक लेजेंड्सने (Classic Legends) येझ्दी ब्रॅँडच्या तीन नवीन बाईक्स गुरुवारी (ता.१३) भारतात लाँच केल्या. या बरोबरच आता क्लासिक बाईक सेगमेंटमध्ये राॅयल एनफिल्ड, जावा आणि बेनेलीसारख्या कंपन्यांसाठी आता स्पर्धा वाढली आहे. येझ्दीने ज्या तीन बाईक लाँच केल्या आहेत, त्यांची किंमत १.९८ लाख रुपयांपासून सुरु होते.

किंमत आहे एवढी

येझ्दी बाईकचे (Yezdi Bikes)लाँच झालेल्या तिन्ही माॅडलमध्ये सर्वात कमी किंमत रोडस्टारची (Roadster) आहे. दिल्लीत तिची एक्स शोरुम किंमत १.९८ लाखांपासून सुरु होते. या प्रमाणेच दुसरे माॅडल स्क्रॅब्लरची (Scrambler) किंमत २.०४ लाखांपासून आणि सर्वात महागडे माॅडल अॅडव्हेन्चरची (Adventure) किंमत २.०९ लाखांपासून सुरु होते. (Yezdi Bikes Launch Its Three Models After 26 Years In India)

Yezdi Roaster
Yezdi Roasteresakal
Yezdi Bikes
Mahindra ने 'या' बाईकला दिले नव रुप, भारतात २६ वर्षानंतर होणार लाँच

अनेक चित्रपटांमध्ये दिसली बाईक

येझ्दी बाईकची भारतात तब्बल २६ वर्षानंतर घर वापसी झाली आहे. कंपनीने नवीन लूक आणि डिझाईनसह लाँच केले आहे. यापूर्वी येझ्दी बाईक्स १९६० च्या दशकाच्या शेवटी भारतीय बाजारात लाँच करण्यात आली होती. नंतर ९० च्या दशकात तिचे उत्पादन बंद केले गेले. तेव्ही ही बाईक्स रोडकिंग, क्लासिक मोनार्क ब्रँड नावाबरोबर येत होती. जवळपास ३० वर्षांपर्यंत भारतीय बाजारात ती लोकप्रिय होती. तसेच या बाईक्स त्या वेळच्या अनेक चित्रपटांमध्येही पाहायला मिळतात.

Yezdi Bikes
येतेय हार्ले-डेव्हिडसनची परवडणारी इलेक्ट्रिक बाईक; जाणून घ्या डिटेल्स

देशात वेगाने वाढलाय रेट्रो बाईकचे ट्रेंड

कंपनीला आशा आहे की येझ्दी बाईक्सला पुन्हा भारतात पूर्वीसारखे प्रेम मिळेल. देशातील मोटारसायकल बाजारात रेट्रो म्हणजे क्लासिक बाईक्सची क्रेझ खूपच वाढली आहे. आता या सेगमेंटमध्ये राॅयल एनफिल्ड नंबर एक आहे. या ट्रेंडमध्ये येण्यासाठी इतर कंपन्याही रेट्रो बाईक्स आणत आहेत. या व्यतिरिक्त अनेक जुने ब्रँडही पुन्हा नव्याने बाजारात येत आहेत. काही वर्षांपूर्वी भारतीय बाजारात जावाची (JAWA) रिलाँचिंग करण्यात आली होती.

येझ्दीची वैशिष्ट्ये

येझ्दी अॅडव्हेंचर दूरचा प्रवास आणि धाडसी प्रवासासाठी प्रसिद्ध आहे. ती लूकमध्ये राॅयल एनफिल्ड (Royal Enfield) च्या Himalayan सारखी आहे. दुसरीकडे येझ्दी स्क्रॅब्लरला ऑफ रोड बायकिंग आणि डेली काॅम्प्युटिंगसाठी डिझाईन केले गेले आहे. ही बाईक कार्यालयाला ये-जा आणि छोट्या ट्रिपसाठी योग्य आहे. कंपनीची तिसरी येझ्दी रोडस्टार ही एक प्रकारची क्रूझ बाईक आहे.

Yezdi Bikes
प्रतिक्षा संपली! पहिली इलेक्ट्रिक रिक्षा Mahindra Treo करा खरेदी

कंपनीने दिले लिक्विड कूल इंजिन

क्लासिक लेजेंड्सने येझ्दी अॅडव्हेन्चर (Yezdi Adventure) आणि येझ्दी स्क्रॅब्लरमध्ये (Yezdi Scrambler) स्पोक व्हिल दिले आहे. दुसरीकडे येझ्दी रोडस्टारमध्ये (Yezdi Roadster) एलाॅय व्हिल आहे. तिन्ही माॅडल्समध्ये ३३४ सीसी लिक्विड कूल्ड इंजिन दिले गेले आहे. हे इंजिन अॅडव्हेन्चरमध्ये ३०.२ पीएसची मॅक्स पाॅवर आणि २९.९ एनएमचे पीक टाॅर्क जेनरेट करते. दुसरीकडे स्क्रॅब्लरमध्ये २९.१ पीएसची मॅक्स पाॅवर आणि २८.२ एनएमचे पीक, दुसरीकडे रोडस्टारमध्ये २९.७ पीएसचे मॅक्स पाॅवर आणि २९ एनएमचे पीक टाॅर्क जेनरेट करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()