गॅजेटमधील खराब झालेली बॅटरी पुन्हा वापरणे शक्य, मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी लावला नवा शोध

आता मुंबई विद्यापीठातच्या विद्यार्थ्यांनी एक नवा शोध लावला आहे. त्यानुसार इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधील खराब झालेल्या बॅटरीचा पुनर्वापर करणे शक्य आहे.
Mumbai University
Mumbai University Sakal
Updated on

मोबाइल फोन, लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्ट वॉच या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात नेहमी करत असतो. यातील कोणत्याही वस्तूची बॅटरी खराब झाली तर नवीन घ्यायला मोठा खर्च येतो. अशावेळी नवीन वस्तू घेण्याशिवाय पर्याय नसतो.

Mumbai University
Innova ची नवीन गाडी पेट्रोलवर नाही तर या खास इंधनावर धावणार! नितीन गडकरींच्या हस्ते या तारखेला होणार लाँच

पण आता मुंबई विद्यापीठातच्या विद्यार्थ्यांनी एक नवा शोध लावला आहे. त्यानुसार इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधील खराब झालेल्या बॅटरीचा पुनर्वापर करणे शक्य आहे. वापरून खराब झालेल्या लिथियम आयन बॅटरी (Li-आयन बॅटरी) मधील महत्त्वाच्या घटकांचा पुनर्वापर ( रिसायकल) करून पुन्हा नवीन उच्च क्षमतेची ली-आयन बॅटरी बनवणे आता शक्य आहे.

Mumbai University
Beed Startup : इन्फोसिसमधला ऑफीस बॉय ते २ स्टार्ट अप्सचे मालक! पत्राच्या शेडमध्ये सुरू झाली बीडच्या लेकाची यशोगाथा

रसायनशास्त्र विभागातील संशोधक प्राध्यापक डॉ. विश्वनाथ आर. पाटील यांच्या संशोधन करणाऱ्या टीमने हा कारनामा करून दाखवला आहे.

Mumbai University
Chandrayaan 3 Photoshoot : 'चांद्रयान-2'ने केलं 'चांद्रयान-3'चं फोटोशूट; चंद्राच्या कक्षेतून कसं दिसतंय विक्रम लँडर?

संशोधनाला सुवर्ण पदक

मुंबई विद्यापीठाचे हे संशोधन आंतरराष्ट्रीय नामांकित जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्याचबरोबर या संशोधनाचे पेटंटही शासनाकडे नोंदवण्यात आले आहे. त्यांच्या या संशोधनासाठी राष्ट्रीय पातळीवर त्यांना अन्वेषण व अविष्कार या संशोधन स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()