You Tube: यूट्यूबवर नवनवे फीचर्स यूजर्ससाठी येत असतात. आता यूट्यूबवर आणखी एक नवे फीचर येणार आहे, जे AI शी संबंधित आहे. गुगल सध्या यूट्यूबवर अशा AI स्किलवर काम करत आहे, ज्याचा वापर करून यूजर्स ट्यून वाजवून किंवा फक्त टेक्स्ट प्रॉम्प्ट देऊन गाणी सर्च करू शकणार आहेत.
या AI फिचरचे नाव 'आस्क फॉर म्युझिक' आहे. यूजर्स त्यांच्या आवडीनुसार गाणी शोधण्यासाठी जनरेटिव्ह एआय चॅटबॉटचा वापर करू शकतो. तसे, Play, Sing or Hum to Search हे फीचर नुकतेच YouTube वर लाँच करण्यात आले आहे. या फीचरमध्ये तुम्ही AI वापरून तुमच्या आवडीचे गाणे वेगवेगळ्या प्रकारे शोधू शकता.
माहितीनुसार तुम्ही हे फीचर ॲक्सेस करताच तुम्हाला स्क्रीनवर एक प्रॉम्प्ट द्यावा लागेल किंवा एक ट्यून द्यावा लागेल. त्यानंतरच AI जनरेट केलेला निकाल तुमच्यासमोर असेल. या व्यतिरिक्त, आणखी एक गोष्ट समोर आली आहे की आस्क फॉर म्युझिक फिचर प्रायोगिक आहे. ज्यामुळे ते देत असलेल्या निकालांची गुणवत्ता आणि अचूकता भिन्न असू शकते. याशिवाय त्यात सबमिट बटण देखील देण्यात आले आहे.
रिपोर्ट्सनुसार, अँड्रॉइड व्हर्जन 7.06.53 मधील YouTube च्या AI फीचरशी संबंधित माहिती टीअरडाउन दरम्यान दिसली आहे. त्यानंतर असे दिसते की आस्क फॉर म्युझिक फीचरवर काम केले जात आहे. दुसरीकडे, या एआय फिचरकडे एक प्रयोग म्हणूनही पाहिले जात आहे.
AI च्या मदतीने माहिती मिळवता येते
रिपोर्ट्सनुसार, युजर्सना आस्क फॉर म्युझिक फीचरमध्ये चॅटबॉटची सुविधा मिळेल. याचा वापर करून तुम्ही गाणी, कलाकार आणि अल्बमची माहिती प्रॉम्प्टसह मिळवू शकाल. याशिवाय, चॅटबॉट गाण्यांच्या आणि अल्बमच्या लिंक्सही यूजर्ससोबत शेअर करेल. जर हे AI फिचर थेट झाले तर, ही YouTube ची पहिली पूर्ण AI सेवा असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.