Reliance Jio चे 'हे' प्लॅन्स करतील तुमची हजारो रुपयांची बचत!

रिलायन्स जिओचे 'हे' प्लॅन्स करतील तुमची हजारो रुपयांची बचत!
jio
jioesakal
Updated on
Summary

असा एक मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही रिलायन्स जिओ रिचार्जमध्ये 1,000 रुपयांपेक्षा जास्त बचत करू शकता.

रिलायन्स जिओने (Reliance Jio) 10 दिवसांपूर्वी आपले रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plans) महाग केले आहेत. जिओचे प्लॅन 700 रुपयांपर्यंत महाग झाले आहेत. तथापि, असा एक मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही रिलायन्स जिओ रिचार्जमध्ये 1,000 रुपयांपेक्षा जास्त बचत करू शकता. 2GB डेटा ऑफर करणारे बेसिक अनलिमिटेड प्लॅन आहेत जे तुमचे पैसे वाचवू शकतात. रिलायन्स जिओ व्यतिरिक्त एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन (Vodafone) - आयडियाने (Idea) देखील त्यांचे रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. (You will save more than one thousand rupees from Reliance Jio recharge)

jio
SBI Alert : शनिवारी बंद राहतील इंटरनेट बॅंकिंग, YONO, UPI सुविधा

दररोज 2GB डेटा ऑफर करणाऱ्या प्लॅनमध्ये 1018 पर्यंत करा बचत

रिलायन्स जिओच्या रिचार्जमध्ये बचत करण्यासाठी तुम्हाला एक वर्षाची वैधता देणारे प्लॅन घ्यावे लागतील. जर तुम्ही 28 दिवसांची वैधता असलेला प्लॅन घेतलात तर तुम्हाला वर्षातून 13 वेळा रिचार्ज करावे लागेल. 28 दिवसांचा प्लॅन 299 रुपये आहे. म्हणजेच एका वर्षासाठी तुम्हाला 3897 रुपये खर्च करावे लागतील. त्याच वेळी, जर तुम्ही Jio चा वर्षभराचा 2879 रुपयांचा प्लॅन रिचार्ज केलात तर तुमची थेट 1018 रुपयांची बचत होईल. तथापि, वार्षिक योजनेत तुम्हाला एकाच वेळी थोडी मोठी रक्कम खर्च करावी लागेल; परंतु बऱ्यापैकी बचत होते.

अशाप्रकारे वाचवू शकता 600 रुपये

जर तुम्ही 28 दिवसांऐवजी 56 दिवसांचा प्लॅन घेतलात तर तुम्हाला वर्षभरात 6 पेक्षा जास्त वेळा रिचार्ज करावे लागेल. जिओचा 56 दिवसांचा बेसिक प्लॅन दररोज 2GB डेटा देणारा 533 रुपये आहे, त्यामुळे एका वर्षासाठी तुम्हाला सुमारे 3,475 रुपये खर्च करावे लागतील. त्याच वेळी, जर तुम्ही 2879 रुपयांचा प्लॅन रिचार्ज केलात तर तुमची सुमारे 600 रुपयांची बचत होईल.

jio
रिलायन्स Jio चे सर्वांत स्वस्त प्लॅन्स! कमी किमतीत बंपर डेटा

तुम्ही अशाप्रकारे वाचवू शकता 245 रुपये

त्याचवेळी, जर तुम्ही 84 दिवसांचा प्लॅन घेतलात तर तुम्हाला एका वर्षात 4 पेक्षा जास्त वेळा रिचार्ज करावे लागेल. दररोज 2GB डेटा आणि 84 दिवसांची वैधता असलेला मूळ प्लॅन 719 रुपये आहे. म्हणजेच वर्षभराच्या वैधतेसाठी तुम्हाला 3124 रुपये खर्च करावे लागतील. त्याचवेळी, जर तुम्ही एका वर्षाची वैधता देऊन 2879 रुपयांचे रिचार्ज केले तर तुमचे थेट 245 रुपये वाचतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.