YouTube Bans Pornhub: YouTube ने Pornhub च्या युट्यूब चॅनेलला आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवले आहे. कम्यूनिटी गाइडलाइन्सचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, Pornhub ने YouTube च्या एक्सटर्नल पॉलिसी लिंकचे उल्लंघन केले आहे. यामध्ये न्यूडिटी आणि पोर्नोग्राफीचा समावेश आहे. अशाप्रकारचा कॉन्टेंट युट्यूबवर अपलोड करण्यास परवानगी नाही.
YouTube च्या प्रवक्त्यांनी माहिती दिली की, रिव्ह्यूनंतर Pornhub Official चॅनेलला प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आले आहे. नियम हे सर्वांसाठी समान असतात. जे चॅनेल्स पॉलिसीचे उल्लंघन करतात, त्यांना टर्मिनेट केले जाते. पोर्नहबच्या या चॅनेलला जवळपास ९ लाख यूजर्सने सबस्क्रिप्शन केले होते. कंपनीने माहिती दिली की, युट्यूबवर पोस्ट होणाऱ्या व्हीडिओवर वयाची अट देखील घातली जात होती. त्यामुळे ठराविक वयोगटातील व्यक्तींनाच हे व्हीडिओ पाहता येत असे.
नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे Pornhub चे म्हणणे
Pornhub Official वर युट्यूब चॅनेलवर पोस्ट करण्यात आलेले व्हीडिओ केवळ १८पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींनाच पाहता येत होते. कंपनीने म्हटले आहे की, साइटद्वारे कोणत्याही अॅडल्ट कॉन्टेंटला पोस्ट केले जात नव्हते. तसेच, इंटरनेट यूजर्सला सुरक्षितता प्रदान करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला जातो. युट्यूबच्या कोणत्याही कम्यूनिटी गाइडलाइन्सचे उल्लंघन केलेले नाही, असेही पोर्नहबने म्हटले आहे.
Instagram ने देखील बंद केले आहे अकाउंट
केवळ युट्यूबच नाही तर इंस्टाग्रामने देखील Pornhub च्या अकाउंटला कायमचे बॅन केले आहे. इंस्टाग्रामने म्हटले होते की, पोर्नहबद्वारे न्यूडिटी, अॅडल्ट कॉन्टेंट आणि इतर आक्षेपार्ह कॉन्टेंट पोस्ट केला जात होता. त्यामुळे अकाउंट बंद करण्यात आले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.