First Video on YouTube : जगातील सगळ्यात मोठा व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म म्हणजे यूट्यूब. आज यूट्यूबचे जगभरात अब्जावधी यूजर्स आहेत, आणि दररोज याठिकाणी कोट्यवधी व्हिडिओ अपलोड होतात. मात्र यूट्यूबवरचा पहिला व्हिडिओ कोणता आहे हे तुम्हाला माहिती आहे का? आजच्या दिवशी, म्हणजेच 24 एप्रिल 2005 रोजी यूट्यूबवर पहिला व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता.
यूट्यूबवरील पहिल्या व्हिडिओचं कॅप्शन 'Me at the Zoo' असं आहे. यूट्यूबच्या सहसंस्थापकांपैैकी एक असणाऱ्या जावेद करीम यांनी हा व्हिडिओ अपलोड केला होता. हा व्हिडिओ सॅन डिएगो प्राणीसंग्रहालयातील आहे. याठिकाणी असलेल्या हत्तींच्या पिंजऱ्यासमोर उभे असलेले जावेद या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. अवघ्या 18 सेकंदांचा हा व्हिडिओ त्यांचा मित्र याकोव्ह लापित्स्की यांनी रेकॉर्ड केला होता.
या व्हिडिओला आतापर्यंत 16 मिलियन पेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसंच आतापर्यंत तब्बल 317 मिलियन पेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
स्टीव्ह चेन, चॅड हर्ली, जावेद करीम या तीन जणांनी मिळून यूट्यूब सुरू केलं होतं. हे तिघेही पेपॅल या कंपनीतील माजी कर्मचारी होते. ते सुरुवातीला एक डेटिंग वेबसाईट तयार करणार होते, मात्र नंतर सामान्य नागरिकांना आपले व्हिडिओ अपलोड करण्यासाठीचा प्लॅटफॉर्म तयार करणं अधिक योग्य ठरेल असं त्यांना वाटलं. 2005 साली मे महिन्यात यूट्यूब लाँच करण्यात आलं होतं. यानंतर एकाच वर्षानंतर गुगलने यूट्यूब विकत घेतलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.