YouTube Video: युट्यूबने हटवले तब्बल ५६ लाख व्हीडिओ, भारत आघाडीवर; 'हे' आहे कारण

युट्यूबने आपल्या प्लॅटफॉर्मवरून तब्बल ५६ लाख व्हीडिओ हटवले आहेत. यात भारतातील १७ लाख व्हीडिओचा समावेश आहे.
Youtube
YoutubeSakal
Updated on

YouTube Removes 56 Lakh Videos: व्हीडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबने जवळपास ५६ लाख व्हीडिओज हटवले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याने कंपनीकडून ही कारवाई करण्यात आले आहे. हटवण्यात आलेल्या ५६ लाखांपैकी एकट्या भारतातील १७ लाख व्हीडिओ आहेत. युट्यूबने २०२२ च्या आपल्या जुलै-सप्टेंबरच्या रिपोर्टमध्ये याबाबतची माहिती दिली आहे. युट्यूबने गेल्या तिमाहीत भारतातून क्रमशः १३ लाख आणि ११ लाख व्हीडिओ हटवले होते.

जागतिक स्तरावर युट्यूबने कंपनीच्या पॉलिसीचे उल्लंघन केल्याने ५६ लाख व्हीडिओ हटवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने माहिती दिली की, मशीनद्वारे डिटेक्ट करण्यात आलेल्या ३६ टक्के व्हीडिओंवर त्वरित कारवाई करण्यात आळी. या व्हीडिओंना एकही व्ह्यूज नव्हते. ३१ टक्के व्हीडिओ १ ते १० व्ह्यूज होते. याशिवाय, नियमांचे उल्लंघन केल्याने जवळपास ७३.७ कोटी कॉमेंट्स देखील डिलीट करण्यात आल्या आहेत.

Youtube
भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

या ५ देशांमधून हटवण्यात आले सर्वाधिक व्हीडिओ

युट्यूबच्या आकडेवारीनुसार ९९ टक्के कॉमेंट्सला ऑटोमेटेड सिस्टमद्वारे अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानंतर या कॉमेंट्स डिलीट करण्यात आल्या. तर १ टक्के कॉमेंट्सवर यूजर्सकडून तक्रार करण्यात आली होती. वर्षातील तिसऱ्या तिमाहीत भारतासह इंडोनेशिया, अमेरिका, ब्राझील आणि रशिया या देशातील सर्वाधिक व्हीडिओ डिलीट करण्यात आले आहेत. भारत सलग ११व्या तिमाहीत हटवण्यात आलेल्या व्हीडिओच्या लिस्टमध्ये टॉपवर आहे.

Youtube
Best Apps: TikTok-Instagram ला मागे टाकत 'हे' ठरले वर्षातील सर्वोत्तम अ‍ॅप, फीचर्स आहेत खास

५० लाख यूट्यूब चॅनेल्सवर देखील केली कारवाई

युट्यूबने जारी केलेल्या जुलै-सप्टेंबरच्या रिपोर्टनुसार कंपनीने जगभरातील जवळपास ५० लाख युट्यूब चॅनेल्सला देखील हटवले आहे. यातील बहुतांश चॅनेल्सवर स्पॅम पॉलिसीचे उल्लंघन केल्याने कारवाई करण्यात आली आहे. ९० टक्क्यांपेक्षा अधिक व्हीडिओवर फेक कॉन्टेंटमुळे कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.