Beerbiceps Channel Deleted : यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया उर्फ 'बीयर बायसेप्स'चे दोन्ही यूट्यूब चॅनल हॅक; नाव बदललं, सगळे व्हिडीओही केले डिलीट

beerbiceps channel deleted : प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहबादिया याचे दोन्ही यूट्यूब चॅनल हॅक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
beerbiceps channel deleted
beerbiceps channel deleted
Updated on

प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहबादिया याचे दोन्ही यूट्यूब चॅनल हॅक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवारी रात्री सायबर गुन्हेगारांकडून हल्ला झाल्यानंतर कथितरित्या चॅनल्स हॅक करण्यात आले. इतकेच नाही तर हॅकर्सनी त्याच्या चॅनल्सची नावे देखील बदलल्याचा प्रकार समोर आला होता. रणवीरच्या चॅनलचे नाव बीयर बायसेप्स बदलून @Elon.trump.tesla_live2024 तर त्याच्या पर्सनल चॅनलचे नाव @tesla.event.trump 2024 करण्यात आले होते.

यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया याच्याबद्दल सांगायचे झाल्या त्याने वयाच्या २२व्या वर्षी आपले पहिले यूट्यूब चॅनल बीयर बायसेप्स सुरू केले होते. आज त्याचे सात यूट्यूब चॅनल आहेत. त्याच्या सर्व चॅनल्सवर तब्बल १२ मिलीयन फॉलोअर्स देखील आहेत. पण हॅकिंगच्या घटनेनंतर त्याचे दोन चॅनल्स डीलीट करण्यात आले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार जेव्हा हे चॅनल्स सर्च केले गेले तेव्हा यूट्यूबकडून एक मेसेज दिसून आला ज्यामध्ये सांगण्यात आले होते की कंपनीच्या पॉलिसीचे उल्लंघन केल्यामुळे चॅनल्स काढून टाकण्यात आले आहेत. तसेच लाइव्ह स्ट्रीमिंग पेजवर हे पेज उपलब्ध नसल्याचा मॅसेज दिसत होता.

beerbiceps channel deleted
Jio Recharge Plan : जीओचे सीम फक्त सुरू ठेवायचंय? खिशाला परवडतो 'हा' परफेक्ट प्लॅन; डेटा, SMS सोबत बरंच काही

हॅकिंगच्या प्रकारानंतर काही तासात रणवीरने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्याने लिहिले की, माझ्या आवडीचा पदार्थ व्हिगन बर्गरसोबत माझे मुख्य दोन यूट्यूब चॅनल हॅक होणं सेलिब्रेट करतोय.

beerbiceps channel deleted
PM Modi Pune Visit Cancelled : पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा रद्द; नेमकं काय आहे कारण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.