Viral Video: कोट्यवधीची संपत्ती,18 लाखांची बाईक; पण विमा संपलेला! निखिल कामत अन् रिया चक्रवर्तीचा व्हायरल व्हिडिओ पाहाच

Nikhil Kamath Bike Ride with Rumoured Girlfriend Rhea Chakraborty Controversy over Expired Insurance Suzuki Intruder VZR 1800 ZL2 : सोशल मीडियावर तूफान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये निखिल कामत रिया चक्रवर्तीसोबत विमा संपलेली बांद्रा परिसरात सुझुकी इंट्रुडर VZR 1800 ZL2 या लाखाची बाईक चालवताना दिसले.
Nikhil Kamath Seen Riding 18 Lakh Rupees Suzuki Intruder in Mumbai with Expired Insurance
Nikhil Kamath Seen Riding 18 Lakh Rupees Suzuki Intruder in Mumbai with Expired Insuranceesakal
Updated on

Nikhil Kamath Rhea Chakraborty Viral Video : झीरोधाचे सह-संस्थापक निखिल कामत हा मुंबईत प्रसिद्ध अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत बाईकवर फिरताना दिसले आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. मात्र, या चर्चेचे कारण त्यांची मैत्रीण नसून, त्यांची महागडी बाईक आणि संपलेला बाईक विमा आहे.

सोशल मीडियावर तूफान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये निखिल कामत बांद्रा परिसरात सुझुकी इंट्रुडर VZR 1800 ZL2 या लाखाची बाईक चालवताना दिसले. जॅकेट आणि शॉर्ट्स परिधान केलेले असलेले कामत हेलमेट आणि मास्क लावून रिचा चक्रवर्तीशी बोलत होते.

Nikhil Kamath Seen Riding 18 Lakh Rupees Suzuki Intruder in Mumbai with Expired Insurance
UPSC Success Story : गुगलची लाखोंची नोकरी सोडली अन् बनला युपीएससी टॉपर ; ना टिना डाबी ना सृष्टी देशमुख, कोण आहे हा IAS अधिकारी?

या गाडीची खासियत काय?

सुझुकी इंट्रुडर ही सीरीज क्रूझर बाईक्ससाठी प्रसिद्ध आहे. या सीरीजमधील VZR 1800 ZL2 ही एक दमदार बाईक आहे. भारतात बंद झालेल्या या मॉडेलची किंमत १५.९५ लाख ते १६.४५ लाख रुपयांदरम्यान होती. ऑन-रोड किंमत १८ लाखांपर्यंत जाते.

सोशल मीडियाच्या नजरेला मात्र या बाईकपेक्षा तिची नंबरप्लेट पहिला दिसली. एका नेटकऱ्याने चौकशी करून या बाईकचा विमा गेल्या वर्षीच संपला असल्याचे उघड केले. यावरून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. ही महागडी बाईक मुंबईत भाड्याने घेतलेली नसून, ती थेट बेंगलोरच्या रहिवासी असलेल्या निखिल कामत यांच्याच नावावर आहे. यावरून नेटकऱ्यांनी कामत यांना विमा नूतनीकरण करण्याचा सल्ला दिला.

Nikhil Kamath Seen Riding 18 Lakh Rupees Suzuki Intruder in Mumbai with Expired Insurance
Aadhaar Card Tips : आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक केलेला हे विसरलात? एका क्लिकवर करा नंबर लिंकचं काम

वृताकडून मिळालेल्या माहितीनुसार, कामत यांनी ही बाईक एप्रिल २०१२ मध्ये बेंगलोरमध्ये रजिस्टर केली होती. मात्र, जुलै २०२३ मध्ये त्यांचा विमा संपला.

निखिल कामत हे झीरोधा या शेअर ब्रोकरेज फर्मचे सह-संस्थापक आहेत. त्यांनी २०१० मध्ये आपल्या भावासोबत झीरोधाची स्थापना केली. या यशस्वी कारकिर्दीमुळे ते एका काळी भारतातील सर्वांत तरुण बिलियनियर ठरले. सध्या ते True Beacon या संपत्ती व्यवस्थापन कंपनीचेही सह-संस्थापक आहेत. इतकेच नाही तर ते एक लोकप्रिय पॉडकास्टचे होस्टही आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.