Zomato AI : कायतरी खायचंय, पण काय ते कळत नाही? झोमॅटोचा 'एआय चॅटबॉट' करेल मदत

AI Tool : झोमॅटोने आपल्या ग्राहकांसाठी 'झोमॅटो एआय' लाँच केलं आहे.
Zomato AI Chatbot
Zomato AI ChatboteSakal
Updated on

फूड डिलिव्हरी अ‍ॅप्समुळे आता घरबसल्या जेवण ऑर्डर करणं अगदी सोपं झालं आहे. त्यातच कित्येक अ‍ॅप्सवर यूजर्ससाठी आकर्षक ऑफर्स देखील सुरू असतात. मात्र, एका क्लिकवर जेवण मागवता येत असलं, तरीही काय खायचंय? हे ठरवण्यासाठी मात्र कधी-कधी भरपूर विचार करावा लागतो.

आपल्या ग्राहकांची हीच समस्या लक्षात घेऊन झोमॅटोने एक नवीन फीचर लाँच केलं आहे. झोमॅटोने आपल्या ग्राहकांसाठी 'झोमॅटो एआय' लाँच केलं आहे. हा एआय चॅटबॉट तुम्हाला काय खायचं आहे हे ठरवण्यासाठी मदत करणार आहे.

Zomato AI Chatbot
Google AI : गुगलचं 'एआय सर्च टूल' भारतातही झालं लाँच! हिंदीलाही करणार सपोर्ट; जाणून घ्या कसा होणार उपयोग

कसं करेल काम?

हा एआय चॅटबॉट झोमॅटोच्या अ‍ॅपमध्येच असणार आहे. यासाठी तुम्हाला वेगळं अ‍ॅप घेण्याची गरज नाही. तुम्ही याला सध्याचं वातावरण, तुमचा मूड, डाएट याबाबत माहिती दिल्यानंतर तुम्ही काय खाल्लं पाहिजे याचं सजेशन तो चॅटबॉट तुम्हाला देईल. एवढंच नाही, तर तुम्हाला किती कॅलरीज खायच्या आहेत, हँगओव्हर झाल्यानंतर काय खावं असे प्रश्नही तुम्ही या चॅटबॉटला विचारू शकता.

ग्राहकांचा वेळ वाचणार

यासोबतच अ‍ॅपच्या नवीन व्हर्जनमध्ये एक व्हिजेट फीचरही मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला जो पदार्थ हवा आहे, तो मिळणाऱ्या हॉटेल आणि रेस्टॉरंटची यादी दिसणार आहे. यामुळे तुम्ही कमी वेळात योग्य ठिकाण शोधून आपली ऑर्डर प्लेस करू शकता.

Zomato AI Chatbot
AI for Earning : क्रिप्टोमध्ये गमावली आयुष्यभराची कमाई; एआयच्या मदतीने पुन्हा कमावले एक कोटी रुपये!

गोल्ड मेम्बरसाठी उपलब्ध

सध्या हे फीचर केवळ गोल्ड मेम्बर्ससाठी उपलब्ध असल्याचं झोमॅटोने स्पष्ट केलं आहे. झोमॅटोच्या गोल्ड मेम्बरशिपसोबत ग्राहकांना अधिक डिस्काऊंट आणि कमी डिलिव्हरी चार्जेस मिळू शकतात. तसेच गोल्ड मेम्बर असणाऱ्या ग्राहकांची ऑर्डर अधिक प्राधान्याने तयार होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.