Zomato Hiring: झोमॅटो आता चोवीस तास देणार फूड डिलिव्हरी? लवकरच सुरु होणार मोठी भरती

झोमॅटोनं यासाठी नव्या अटीशर्ती ठेवल्या आहेत.
zomato layoff
zomato layoffSakal
Updated on

नवी दिल्ली : झोमॅटोनं नुकतीचं आपली तीन टक्के कर्मचारी कपात केली होती. पण आता पुन्हा मोठी भरती सुरु केली आहे. विशेष म्हणजे झोमॅटो आता सात दिवस २४ तास सेवा देणार आहे. कंपनीचे संस्थापक दिपिंदर गोयल यांनी याबाबत नुकतीच माहिती दिली. पण यामुळं आता फूड डिलिव्हरी क्षेत्रातही मोठी स्पर्धा सुरु होत असल्याची चिन्हं आहेत.

zomato layoff
Pathan Movie: 'पठाण'वरुन इंदूरमध्ये जातीय तणाव! ५० जणांवर गुन्हा दाखल

झोमॅटोचे संस्थापक दिपिंदर गोयल यांनी नुकतीच लिंक्डइनवर (LinkedIn) एक पोस्ट केली होती. यामध्ये ८०० कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पण यातील अटीशर्टी सर्वांचं लक्ष वेधून घेतात. यामध्ये म्हटलं की, उमेदवारांना त्यांचा 'वर्क-लाईफ बॅलन्स' विसरावा लागेल. (वर्क-लाइफ बॅलन्स म्हणजे एक अशी समतोल स्थिती जिथं एखादी व्यक्ती आपल्या करिअरच्या मागण्या आणि वैयक्तिक जीवनाच्या मागण्यांना समान प्राधान्य देते)

zomato layoff
Uddhav Thackeray-Eknath Shinde : उद्धव ठाकरे ठाण्यात, थेट एकनाथ शिंदेंना आव्हान; जोरदार शक्तीप्रदर्शन

झोमॅटो विविध पाच पोस्टसाठी तब्बल ८०० कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. यामध्ये प्रॉडक्ट मॅनेजर, इंजिनिअर्स, ग्रोथ मॅनेजर्स आणि इतर अनेक पदांचा समावेश आहे. पारंपारिक कामाच्या पद्धतींना विसरुन ज्यांना चावीस तास काम करण्यात अडचण नसेल अशा इच्छुक उमेदवारांनी आमच्याशी संपर्क साधावा असं गोयल यांनी आपल्या लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटलं आहे.

zomato layoff
Prakash Ambedkar : दोनच दिवसात बेबनाव? शिवसेनेचा प्रकाश आंबेडकरांना मोलाचा सल्ला

दरम्यान, झोमॅटोनं नोव्हेंबर महिन्यातच कंपनीची ३ टक्के कर्मचारी कपात केली होती. यामध्ये ३,८०० कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला होता. यामुळं विविध डिपार्टमेंटवर त्याचा परिणामही झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.