Zomato AI Image Remove : तुमच्यासाठी काय पण! नाराज ग्राहकांना मनवण्यासाठी Zomatoने अ‍ॅपमधून हटवलं महत्वाचं फीचर

Zomato to Remove AI-Generated Food Images : Zomatoवरून खाद्यपदार्थाचा आकर्षक फोटो बघून फूड मागावल्यानंतर ते वेगळेच येते या समस्येवर तोडगा काढण्यासाठी झोमॅटो कंपनीने अ‍ॅपमधून सर्व AI जनरेटेड फोटो हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
Zomato to Remove AI-Generated Food Images After Customer Backlash
Zomato to Remove AI-Generated Food Images After Customer Backlashesakal
Updated on

Zomato Latest Update : ग्राहकांनी एका महत्वाच्या विषयी तक्रार केल्यानंतर ऑनलाईन फूड डिलीव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता झोमॅटोवर कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या मदतीने तयार केलेले पदार्थांचे फोटो हटवण्यात येणार आहेत.

झोमॅटोच्या सीईओ दीपिंदर गोयल यांनी सांगितलं की, AI द्वारे बनवलेले फोटो हे ग्राहक आणि रेस्टॉरंट्स यांच्यातील विश्वासघाताचं कारण बनत होते. या फसव्या फोटोंमुळे ग्राहकांना जेवण मिळालं की वेगळं असत असे निराशाजनक अनुभव आले. त्यामुळे रिफंड मागण्यांचं प्रमाण वाढलं आणि रेस्टॉरंट्सना कमी रेटिंग्स मिळाल्या. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X.com (आधीचे ट्विटर) वर गोयल यांनी स्पष्ट केलं की, झोमॅटो मेनू कार्डवर अश्या फसव्या फोटोंचा वापर करण्याला पूर्णपणे विरोध करतो.

Zomato to Remove AI-Generated Food Images After Customer Backlash
Whatsapp Spam Message Blocker : व्हॉट्सअ‍ॅपवर येणारे स्पॅम मेसेज आपोआप होणार ब्लॉक; नवीन फीचर कसं वापराल?

या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी झोमॅटो महिनाअखेरपर्यंत सर्व AI-जनरेटेड फोटो काढून टाकणार आहे. तसेच, रेस्टॉरंट पार्टनर्सनाही अशा फोटोचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. यापुढे खऱ्या पदार्थांचे आकर्षक फोटो वापरण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी झोमॅटो रेस्टॉरंट मालकांना विनामूल्य फूड फोटोग्राफी सेवा देणार आहे.

Zomato to Remove AI-Generated Food Images After Customer Backlash
Swiggy UPI : खुशखबर! Swiggyमध्ये आला UPI पेमेंटचा पर्याय; कसं वापराल? वाचा एका क्लिकवर

PicNic AI आणि झोमॅटोचा वाढता नफा

गेल्या वर्षी झोमॅटोने रेस्टॉरंट्सना फूड इमेज क्वालिटी सुधारण्यासाठी PicNic AI (Picture Nicely AI) हे टूल आणलं होतं. मात्र, आता हे टूल बंद करून खऱ्या फूड फोटोग्राफीला प्राधान्य दिले जाणार आहे. या धोरणामध्ये झोमॅटोचा नफा मात्र वाढत आहे. पहिल्या तिमाही FY25 मध्ये झोमॅटोची रेव्हिन्यू 74% वाढून ₹4,206 कोटी इतकी झाली आहे. तसेच, नेट प्रॉफिटही 126% वाढून ₹253 कोटी इतका झाला आहे.

झोमॅटोच्या या निर्णयामुळे त्यांनी ग्राहकांच्या तक्रारींना जास्त महत्व देऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.