झूमचे नवे फीचर, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये मिळणार ऑटो-कॅप्शन

zoom app
zoom appGoogle
Updated on

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप झूमने (Zoom) त्यांच्या फ्री अकाऊंट वापरकर्त्यांच्या सोयीसाठी लाइव्ह कॅप्शनिंग (auto-generated closed captions) फीचर लॉंच केले आहे. या फीचरच्या मुळे आता यूजर्सना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान लाइव्ह कॅप्शन पाहायला मिळतील. दरम्यान फीचरचा वापरकर्त्यांना चांगला उपयोग होईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. लाइव्ह कॅप्शन हे फीचर पहिल्यांदा पेड झूम वापरकर्त्यांसाठी देण्यात आले होते.

झूमने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, झूमद्वारे सर्व वापरकर्ते एकमेकांशी कनेक्टेड राहणे आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. योग्य साधनांच्या अभावामुळे वापरकर्त्यांना व्हिडिओ कम्युनिकेशन करताना खूप त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच आम्ही आमचा प्लॅटफॉर्म आणखी सुधारणा करण्यावर भर देत आहोत जेणेकरून सर्व वापरकर्ते ते वापरू शकतील.

live captioning फीचर

झूमचे लाइव्ह कॅप्शनिंग फीचर एक्टिव्ह करण्यासाठी, झूम पोर्टलवर जा

त्यामध्ये सेटिंग्जवर जा आणि मीटिंग टॅबवर क्लिक करा

येथे तुम्हाला Closed captioning फीचर सापडेल, त्यावर क्लिक करा

त्यानंतर हे फीचर सुरु होईल

zoom app
देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; एका चार्जमध्ये चालेल 300Km

आणखी अपडेट केलेले फीचर्स

लाइव्ह कॅप्शनिंग फीचर व्यतिरिक्त, झूमने अनेक फीचर्स अपडेट केले आहेत. यामध्ये व्हाईटबोर्ड फीचरचा देखील समावेश आहे. हे फीचर वापरुन वापरकर्ते वेगवेगळ्या डिव्हाईसवरुन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करु शकतील. एवढेच नाही तर व्हर्च्युअल व्हाईटबोर्डच्या माध्यमातून वापरकर्ते इतर वापरकर्त्यांना ज्या प्रकारे प्रत्यक्ष भेटतात तशाच प्रकारे भेटू शकतील. याशिवाय या अपडेटमध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शनचा देखील विस्तार करण्यात आला आहे.

झूमने ऑगस्टमध्ये विद्यार्थ्यांसाठी Focus Mode लाँच केला आहे, या फीचरमुळे विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल क्लासमध्ये लक्ष विचलित होत नाही. तसेच, यूजर्स स्क्रीन सहज पाहू शकतील. या फीचरचा विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना खूप उपयोग होणार आहे.

zoom app
पुढच्या महिन्यात येतेय Tata ची CNG कार; मिळेल जबरदस्त मायलेज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.