Haryana Assembly Elections

Haryana Assembly Elections | Haryana Assembly Elections News. दर पाच वर्षांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबतच हरियाना विधानसभा निवडणुकीसाठीही मतदान होतं. यंदा ९० आमदारांची हरियाना विधानसभा ३ नोव्हेंबर २०२४ रोजी आपली मुदत संपवणार आहे. विधानसभेसाठी मतदान ५ ऑक्टोबर रोजी होईल तर मतमोजणी ८ऑक्टोबरला होईल. सध्या हरियाना येथे भाजपचे सरकार असून नायब सिंह सैनी हे मुख्यमंत्री आहेत. या निवडणुकीमध्ये भाजप, कॉंग्रेस, बसपा, आम आदमी पार्टी यांच्यासोबतच भारतीय राष्ट्रीय लोक दल, जननायक जनता पार्टी, आझाद समाज पार्टी असे प्रमुख पक्ष भाग घेत आहेत. ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकांनंतर भारतीय जनता पक्ष आणि जननायक जनता पक्षाच्या युतीचं सरकार हरियानात स्थापन झालं, ज्यामध्ये मनोहरलाल खट्टर मुख्यमंत्री झाले. मात्र, मार्च २०२४ मध्ये हरियानाच्या राजकारणात मोठा उलथापालथ झाला. युतीमधील मतभेदांमुळे जननायक जनता पक्षाने सरकारमधून माघार घेतली, परिणामी खट्टर सरकार कोसळलं. त्यानंतर, अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर भाजपाचे नायब सिंह सैनी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com